दिव्यांगांच्या कल्याणार्थ राखीव निधी तात्काळ वाटप करावा - खासदार हेमंत पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 10 May 2020

दिव्यांगांच्या कल्याणार्थ राखीव निधी तात्काळ वाटप करावा - खासदार हेमंत पाटील


किनवट : दिव्यांगांच्या विकासाकरिता स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत  राखीव असलेला ५ टक्के निधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगांना वाटप करण्यात यावा, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे .
        कोरोनाच्या संसर्गजन्य  काळात  सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीव जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना  जिल्ह्यातील  अनेक दिव्यांग बांधवाना  आधार सुद्धा नाही. केवळ शासनाच्या तुटपुंज्या मदतीच्या अपेक्षेवर ते जगत आहेत . कोरोनामुळे सर्व सामान्य जनतेचे जीवनमान खडतर झाले असून रोजगार नसल्याने  अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे . त्यातच मतदार संघातील  दिव्यांगांना जीवन जगणे अवघड झाले आहे . अश्या परिस्थिती मध्ये शानाकडून दिव्यांगांसाठी राखीव निधी ठेवण्यात आलेला असतो.पण लॉक डाऊन होऊन २ महिने होत आले तरी जिल्ह्यातील दिव्यांग अजूनही शासनाच्या मदतीकडे आस लावून बसलेले आहेत . त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत ,पंचायत समिती,  जिल्हा परिषद ,संस्थांमधील दिव्यांग विकास म्हणून ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे तो निधी तात्काळ जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या खात्यावर टाकून आर्थिक मदत करण्यात यावी. जेणेकरून अडचणीच्या काळात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे जगणे सुलभ होईल, असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .खासदार हेमंत पाटील जनतेचे खासदार म्हणून जनतेसाठी सदैव कार्यरत असतात शेतकरी ,दिव्यांग , निराधार ,यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाते . म्हणूनच जानेवारी  महिन्यात  संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग तपासणी व साहित्य वाटप  शिबीर घेण्यात आले यामुळे  मतदार संघातील अनेक गरजू दिव्यांग बांधवांनी नोंदणी करून लाभ घेतला घेतला आहे . सर्व सामान्य,दिव्यांगांची  सेवा करणे म्हणजे   ईश्वरसेवेशी जोडण्याचा प्रामाणिक  प्रयत्न असल्याची भावना खासदार हेमंत पाटील यांनी बोलून दाखविली .

No comments:

Post a Comment

Pages