अमरावती प्रतिनिधी,
30/06/2020
बार्टी, अमरावती व विकास तातड व टीम च्या सहायाने सिद्धार्थ नगर, सिव्हिल लाइन्स, भीम नगर येथे RTE अंतर्गत टॉप स्कूल्स मध्ये selection झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना Selection certificate घरपोच देण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून विकास तातड व टीम च्या साहाय्याने बार्टी ने सिद्धार्थ नगर, सिव्हिल लाइन्स व भीम नगर येथे RTE
चे ऑनलाईन फॉर्म मोफत भरून दिले आणि आज त्याची फलश्रुती आपल्याला झालेली दिसते आहे. तब्बल १७ मुला मुलींचे नाव RTE अंतर्गत लागलेले आहे. आज आपण private school ची फीस वर्षाला कमीत कमी
1 लाख जरी पकडली आणि वर्ग 8 पर्यंत 1 विद्यार्थ्या मागे एकूण 8 लाख खर्च पकडल्यास 8,00,000₹ × 17 विद्यार्थी = 1 करोड 36 लाख
इतके पैसे पालकांचे वाचवले आहेत. एका नगरातील एका जरी समाज सेवकाने दर वर्षी हे काम केले तर आपण अशे करोडो रुपये समाजाचे वाचू शकतो व आपल्या समाजातील मुला मुलींना उच्च दर्जाचे शिक्षण देऊ शकतो.
या संपूर्ण कार्यामध्ये बार्टीच्या समतादुत अनिता गवई, उच्च शिक्षित व सामाजिक कार्यकर्ते विकास तातड व त्यांचे सहकारी सुमेध गणेश, मिलिंद वर्धे, रत्ना गणेश, शालू धाकडे, सुनीता वानखेडे, वणमाला मकेश्र्वर यांचा मोलाचा वाटा होता. बार्टी तर्फे अनेक वस्त्यान मध्ये देखील RTE मार्फत सुरू आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये मदत करून RTE कायद्याचा लाभ घ्यावा.


No comments:
Post a Comment