मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षा व्या वतिने पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात किनवट येथे निदर्शने - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 30 June 2020

मार्क्सवादि कम्युनिस्ट पक्षा व्या वतिने पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात किनवट येथे निदर्शने

किनवट, दि 30   : केंद्र शासनाच्या पेट्रोल -डिझेल दरवाढी विरोधात मा.क.पा व्या वतिने नुकतेच  निदर्शने आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन मा.क.पा तालुका कमिटी च्या  वतिने किनवट रोडवरील  पेट्रोल पंप, गोकुंदां येथे करण्यात आले.
आंतर राष्ट्रीय बाजारात पेट्रोल - डिझेल चे दर प्रती बेरेल कमी असतांना, मोदी सरकारच्या वतिने करण्यात आलेली ही दरवाढ अत्यंत अन्याय कारक आहे , देश आर्थीक अडचणीतून जात असतांना सर्व सामान्य जनतेवर अशा प्रकारे पेट्रोल - डिझेल दरवाढ जनतेवार लादने हे अत्यंत चुकीचे  आहे ,सरकारने तात्काळ पेट्रोल - डिझेल दरवाढ वापस घ्यावे, अशी मागणी या वेळी बोलतांना मा.क.पा चे नेते काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.
       पेट्रोल - डिझेल दरवाढी च्या विरोधात जोरदार घोणाबाजी यावेळी करण्यात आली,सोबत पेट्रोल - डिझेल दरवाढी च्या विरोधातील पोस्टर लिहून सरकारचा निषेध करण्यात  आला आणि ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
     या वेळी झालेल्या निदर्शनात मा.क.पा चे नेते काॅ.अर्जुन आडे,काॅ.जनार्दन काळे,स्टॅलिन आडे ,नंदकुमार मोदुकवार, शेख बाबाभाई, राजु कोत्तुरवार, प्रशांत जाधव,प्रफुल कवुडकर, अक्षय गाभणे,महेमुद पठाण, धनलाल राठोड  आदि उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages