वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रक्षिशणाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 18 June 2020

वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रक्षिशणाचे आयोजन

दाभड-नांदेड दि. 18 : महाविहार बावरीनगर दाभड-नांदेड येथे आषाढी पौर्णिमा, दि. 05 जुलै  2020 ते आश्विन पौर्णिमा दि. 01 ऑक्टोबर 2020 पर्यंत वर्षावासानिमित्त श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
बौद्ध धम्मामध्ये आषाढी पौर्णिमेस खुप महत्वाचे स्थान आहे. याच पौर्णिमेस पाच महत्वाच्या घटना घडल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो. त्या म्हणजे महामाया महामातेस पड्लेले स्वप्न अर्थात गर्भधारणा, सिद्धार्थ गौतमाने केलेला ग्रुह्त्याग, पाच परिव्राजकांना धम्माचा प्रथम उपदेश, भिक्खु दिक्षा आणि श्रद्धेय भिक्खुंचा वर्षावास प्रारंभ.
आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या वर्षा ऋतूमध्ये भिक्खूंना धम्माचा प्रचार - प्रसार करताना पावसाचा तथा तत्सम अडचणींचा त्रास होऊ नये म्हणून तथागत भगवान बुद्धांनी प्रस्तुत कालावधीत वर्षावासा संबंधीचे विनय भिक्खुंना सांगितले. त्यानुसार, भिक्खूंनी वर्षा ऋतुमध्ये एकाच ठिकाणी (विहारात) निवास करावा, असा नियम सांगितला. या काळात उपासक -उपासिका बुद्ध विहारात जाऊन धम्म ग्रहण करीत असतात.
याच हेतुने सदर तीन महिन्याच्या कालावधीत महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रक्षिशणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कालावधित बौद्ध धम्म संबंधी (संस्कार, संस्कृती) सखोल व गांभिर्यपूर्वक ज्ञान मिळवण्याची संधी उपासक उपासिकांना लाभणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन श्रद्धेय भिक्खू धम्मसेवक महाथेरो, श्रद्धेय भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, श्रद्धेय भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो, भिक्खू पत्र्त्रारत्न थेरो, भिक्खू संघपाल, भिक्खू शीलरत्न व श्रद्धेय भिक्खू संघाची  उपस्थिती लाभणार आहे.
*वय वर्षे 12 ते 30 दरम्यान असलेल्या उपासकांनी मोठ्या संख्येने श्रामणेर प्राक्षिणात सहभागी होऊन धम्मदानाने लाभान्वित व्हावे व श्रामणेर प्राक्षिणात सहभागी होण्यासाठी दि. 02 जुलै  2020 पर्यंत भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो (8600844888), भिक्खू पत्र्त्रारत्न थेरो (9823573551), भिक्खू संघपाल (9673361358), भिक्खू शीलरत्न (9960955463), इंजि. यशवंत गच्चे (8551078379), डॉ. मिलिंद भालेराव (8275344904) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages