विविध मागण्यासाठी "माकप",चे आज झाले आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 16 June 2020

विविध मागण्यासाठी "माकप",चे आज झाले आंदोलन

माहूर,दि.१६ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शाखा हरडफ (ता. माहूर )च्या वतीने कोरोना काळात लाखो शेतकरी शेतमजुर कामगार विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मदत न करता आत्मनिभर बना म्हणूण आहे त्या स्थितीत सोडणा-या सरकाराच्या निषेधार्थ देशभरात आहे त्या स्थितीत शारीरीक अंतर ठेवून अंगणातच ओदोलन करण्याची हाक मा.क.पा.ने दिली होती त्या नुसार आज(दि.१६) आंदोलन करण्यात आले.

इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५०० रु. रोख दिले पाहिजेत,सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत पुरवले पाहिजे,मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवला पाहिजे, शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करा,बेरोजगारांना ताबडतोबीने बेरोजगार भत्ता जाहीर करा,
राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा; कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घ्या. सर्व शेतकऱ्यांना तातडीने कर्ज माफ करुन, तात्काळ नविन कर्ज वाटप करा ह्या मागणी साठी आजचे  आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा कमेटी सदस्य काॅ. किशोर पवार, काॅ.प्रल्हाद चव्हाण ता.कमेटी सदस्य काॅ. चंद्रभान निलेवाड याच्या सह राजु पिसरवाड,रायसिग राठोड,दयाराम जाधव, सुदिप राठोड, सुशीला पवार, आशा चव्हाण सह आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages