"राजगृहावर" हल्ला करणा-या 'त्या' समाजकंटकांचा शोध घेवून त्वरीत अटक करा आमदार केराम यांची गृहमंत्र्यांकडे मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 8 July 2020

"राजगृहावर" हल्ला करणा-या 'त्या' समाजकंटकांचा शोध घेवून त्वरीत अटक करा आमदार केराम यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

 किनवट ,दि.८ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह' या बंगल्यावर जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हल्ला करून नासधूस करणा-या अज्ञात आरोपींचा शोध घेवून त्वरीत अटक करण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी गृहमंत्र्यांकडे आज(दि.८) केली आहे.
    काल (दि. ७ ) मुंबई येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह' या निवास बंगल्यावर काही अज्ञातांनी हमला करून बंगल्याची नासधूस केली होती. सदर घटना ही देशभरातील आंबेडकरी विचारास मानणा-या व त्यांच्या कोट्यावधी अनुयायांच्या भावनेला ठेच पोहोचविणारी असून सदर घटनेने भारतीय राज्य घटनेचे निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रवाहालाच नव्हे तर कायदा सुव्यवस्थेला आव्हान केले आहे. त्यामुळे ही बाब लोकशाही प्रवन देशात लांच्छनास्पद असून जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने रचलेल्या या षढयंत्रामागील म्होरक्या व त्याच्या बगलबच्च्यांचा तातडीने शोध घेवून त्यास शासन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेला धाब्यावर बसवून जातीय तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव रचणा-या त्या अज्ञात समाजकंटकांचा तातडीने शोध घेवून त्यांना तातडीने अटक करावी, अन्यथा आंबेडकरी विचारक जनता रस्त्यावर उतरेल, असा विनंतीवजा इशारा आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल
 देशमुख यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages