कोविड-19 जलद तपासणीसाठी जिल्ह्याला लवकरच 5 हजार अँटिजेन किट्स - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 20 July 2020

कोविड-19 जलद तपासणीसाठी जिल्ह्याला लवकरच 5 हजार अँटिजेन किट्स


नांदेड  दि. 20 :- जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना-19 आजाराचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी शासनाने पूर्वी 500 अँटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध करुन दिल्या होत्या. या किट्समुळे सुमारे 1 तासात रुग्णांची टेस्ट हाती लागत असल्याने कोरोना व्यवस्थापनाच्यादृष्टिने ही एक मोठी उपलब्धी तपासणीच्यादृष्टिने आहे. या तपासणी किट्सचे वैशिष्ट्ये लक्षात घेता सुमारे 5 हजार ॲटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून हे किट्स येत्या तीन ते चार दिवसात जिल्ह्याला उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages