बावरीनगर दाभड येथे ३ऑगस्टपासून श्रामणेर प्रशिक्षशण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 31 July 2020

बावरीनगर दाभड येथे ३ऑगस्टपासून श्रामणेर प्रशिक्षशण
 दाभड-नांदेड   , : महाविहार बावरीनगर दाभड-नांदेड येथे श्रावण पौर्णिमा ३ ऑगस्टपासून १० दिवसीय  दुसरे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावर्षीच्या वर्षावास काळातले हे दुसरे प्रशिक्षण शिबिर असून १३ ऑगस्ट रोजी या शिबिराची सांगता होणार आहे. श्रामनेर शिबिरामध्ये वय वर्ष १५ ते ३० च्या दरम्यान असणाऱ्या पुरुषांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे पहिल्या श्रामणेर शिबिरात एकूण ८० उपासकांनी सहभाग घेतला होता. दिनांक ३ ऑगस्ट पासून प्रारंभ होणाऱ्या श्रामणेर शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उपासकांनी २ ऑगस्टपर्यंत भदंत विनय बोधीप्रिय थेरो यांच्याकडे नावे नोंदवावीत, असे आवाहन महा उपासक डॉ. एस.पी. गायकवाड यांनी केले आहे.

बौद्ध साहित्यात श्रावण पौर्णिमेसंदर्भात काही महत्वपूर्ण नोंदी आढळतात. जसे अग्रश्रावक अंगुलीमाल यांची धम्मदिक्षा, अनाथपिंडक (सुदत्त) यांचेकडून 160 सुक्त मुखोद्गत करण्यात आले व राजगीर च्या वैभार पर्वताच्या सप्तपर्णी गुहेमध्ये प्रथम धम्म संगितीस प्रारंभ झाला.

श्रामणेर शिबिराच्या कालावधित बौद्ध धम्म संबंधी (संस्कार, संस्कृती) सखोल व गांभिर्यपूर्वक ज्ञान मिळवण्याची संधी उपासक उपासिकांना लाभणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन श्रद्धेय भिक्खू धम्मसेवक महाथेरो, श्रद्धेय भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, श्रद्धेय भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो, भिक्खू पत्र्त्रारत्न थेरो, भिकखू प्रज्ञानंद थेरो-नागपूर, भिक्खू संघपाल, भिक्खू शीलरत्न व पू. भिक्खू संघाची  उपस्थिती लाभणार आहे.

श्रामणेर शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उपासकांची कोविड-१९ कोरोना तपासणी करूनच त्यांना प्रशिक्षणात सहभागी करून घेतले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages