प्रज्ञावंत राजा ढाले - यशवंत भंडारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 15 July 2020

प्रज्ञावंत राजा ढाले - यशवंत भंडारे16 जुलै 2019 ) सकाळी मुंबईतील विक्रोळी येथे निर्वाण झाले .... राजा ढाले यांचा जन्म:  1940 मध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झाला ....   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा वैचारिक वारसदार असलेले ढाले खऱ्या अर्थाने आपल्या जीवणात राजा सारखे जगले ... आपल्या जहाल विचारावर , मतावर ,  वैचारिक भूमिकेवर ठाम राहणारे ...  राजकीय सत्तेपेक्षा आपल्या विचारांची प्रतारणा न करणारे निर्भीड वक्ते ... कोणाचीही  भीक न घालता धर्मचिकित्सा करणारे आणि सामाजिक परिवतनासाठी विद्रोह करणारे प्रज्ञावन्त विचारवंत ... दलित पँथरचे संस्थापक सदस्य ... कवी , विचारवंत , वक्ते , धर्म चिकित्सक ,  बौद्ध धम्म सं संस्कृती आणि साहित्याचे संशोधक - लेखक , आंबेडकरी चळवळीचे आर्धयु , आफाट बुध्दीमतेचा  माणूस , स्नेही , मित्र आणि मार्गदर्शक  ... दलितत्व नव्हे ,  माणूसपण अंतिम महत्वाचं असं ठनकावून सांगनारा माणूस ... ते  आंबेडकरी चळवळीतील एक भारतीय नेते आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक व राजकारणी होतं ...  दलित पँथर नावाची एक सामाजिक संघटना ढाले यांनी अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांच्या मदतीने स्थापन केली होती. त्याअगोदर ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते.... राजा ढाले हे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ मध्ये  लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण निवडून आले नाहीत ... २००४  मध्ये  यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली होती ... मराठीतली सत्यकथेची सत्यकथा यांनीच लिहिली आणि महाराष्ट्रातल्या एका खेड्यात दलित तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्न करणारा काळा स्वातंत्र्यदिन हा लेखही  यांनीच लिहिला....  प्राचीन काळात किल्ल्यात राहून गडकिल्ल्यांचे अहोरात्र संरक्षण करणारे आणि युद्धात आघाडीवर भला मोठा फडकणारा ध्वज घेऊन उभे असणारे लोक म्हणजे ढाले...  असा खुद्द राजा ढालेंनीच आपल्या आडनावाच्या लोकांचा इतिहास शोधून काढला होता ....  हे लोक ध्वज खाली पडू देत नसत. ... एक घायाळ झाला की दुसरा त्याची जागा तडफेने घेऊन ध्वज वरच्या वर झेलत असतं .... तापसी, येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आदी लघु अनियतकालिके आज उपलब्ध नाहीत... पण या  अनियतकालिकांत राजा ढाले यांचं  लेखन प्रसिद्ध झाले आहे.... तसेच त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन आणि संपादने हे सारे साहित्य विखुरलेले आहे...  राजा ढाले यांच्या  आयुष्याबाबत फार माहिती मिळत नाही ...  स्वतः राजा ढाले यांनीही हे निगुतीने जपण्याचा आणि प्रस्थापित होण्याचा खटाटोप केलेला नाही.... असे मातीच्या उदरात लुप्त झाल्यासारखे परंतु आतमध्ये अद्याप जिवंत असणारे झरे शोधून त्याचे पाणी सर्वांपर्यंत आणण्याचे काम अतिशय दुष्कर असते.... ते हाती घेणे हेच एक दिव्य असते ... राजा ढाले यांच्यावर ' खेळ ' या नियतकालिकाचा विशेषांक प्रकाशित झालेला आहे... त्यांना  जीवनगौरव पुरस्काराणे सन्मानित करण्यात आलं होतं ... पुणे महापालिकेचा आंबेडकर पुरस्कार 1 अक्टोबर 2015 रोजी प्रदान करण्यात आला होता .... या झंझावतास भावपूर्ण श्रद्धांजली ...मानवंदना...

                          - यशवंत भंडारे

No comments:

Post a Comment

Pages