माता रमाई बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 28 September 2025

माता रमाई बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न.

जयवर्धन भोसीकर :

माता रमाई बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न 

सहयोग नगर नांदेड येथील माता रमाई बुद्धविहारात वर्षावास डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा वाचन व विवेचनाचा समारोप संपन्न झाला.


या कार्यक्रमाला  प्रमुख उपस्थिती डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते शीलरत्न यांच्यासह आ.बालाजी कल्याणकर, मंगेश कदम प्रशांत इंगोले, साहेबराव गायकवाड, रमेश कोकरे बिराडे सर, इंजि. भरतकुमार कानिंदे, गणपत गायकवाड, भीमराव हाटकर, सुभाष काटकांबळे, भगवान गायकवाड यांच्यासह अनेक बौद्ध उपासक उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते. 


सहयोग नगर येथील माता रमाई बुद्ध विहार येथे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भन्ते शीलरत्न यांच्या मागणीवरून 15 लक्ष रुपये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता वातानुकूलित अभ्यासिका केली. व आणखीन 10लक्ष रुपये व लोकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी ओपन जिम देण्याचे आश्वासन दिले. यासाठी साहेबराव गायकवाड यांनी आमदार कल्याणकर यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला.




वर्षावास कार्यक्रमात डॉ. उपगुप्त महाथेरो,भंते शिलरत्न यांचे प्रवचन झाले तद्नंतर भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध उपासक उपासिका,युवक युवती कार्यक्रमाला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages