नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान, विख्यात अर्थतज्ज्ञ आणि दूरदृष्टीचे नेतृत्व करणारे स्वर्गीय डॉ. मनमोहनसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज राजधानीत एक महत्त्वाचा ऐतिहासिक प्रसंग घडला. त्यांच्या कार्य व योगदानाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या डॉ. मनमोहनसिंग संशोधन केंद्र व ग्रंथालयाचे भव्य उद्घाटन आज नवी दिल्ली येथे संपन्न झाले.या सोहळ्यास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच डॉ. मनमोहनसिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी या वेळी डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.या संशोधन केंद्र व ग्रंथालयामुळे, देशाच्या अर्थकारणात आणि लोकशाही सुदृढीकरणात महत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या विचारसरणीचा अभ्यास करण्यासाठी नवी पिढीला समृद्ध व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
Sunday, 28 September 2025

डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाने संशोधन केंद्र व ग्रंथालयाचे उद्घाटन
Tags
# राष्ट्रीय
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
राष्ट्रीय
Labels:
राष्ट्रीय
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment