नांदेड : ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे नांदेड शहरासह जिल्ह्यातही तपासणी करण्यात येत असून त्यास नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला आहे. नांदेड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात जाऊन ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात येत आहे या अभूतपूर्व मोहिमेत आपल्या वार्डात विविध ठिकाणी शिबीर राबविण्यात पुढाकार घेऊन नवा मोंढा प्रभागाचे नगरसेवक प्रशांत तिडके हे कोरोनाची भीती नाहीशी व्हावी आणि जनतेत जागृती वाढून आपल्या भागातील रुग्ण शक्यता तपासणी साठी पुढाकार घेऊन गल्लोगल्ली फिरून कोरोना टेस्टिंग शिबिर राबविण्यात पुढाकार घेत आहेत.
नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने , जिल्हाधिकारी विपीन इटनकर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन पूर्वक कार्य करीत आहेत.
नांदेड शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारेही तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नांदेड शहरात त्याचबरोबर ग्रामिण भागातही टेस्ट घेण्यात येत आहेत. त्यासाठी जवळपास पाच हजार किट उपलब्ध झाल्या आहेत. नांदेड शहरात महापालिकेच्या वतीने विविध भागात जाऊन विशेष करुन ज्या ठिकाणी कोरोना बाधित जास्त संख्येने आढळून आले आहेत. त्या भागात ज्येष्ठ नागरिक व मुलांचे तसेच आजारी असलेल्या व्यक्तींचीही प्रामुख्याने ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात येत असून शहरी भागात महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पुढाकार घेण्यात येत आहे.
नगरसेवक प्रशांत तिडके यांच्या वतीने आज श्री स्वामी समर्थ केंद्र मगनपूरा येथे कोरोनाची टेस्टिंग शिबिर राबविण्यात आले या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सहभाग नोंदवला तसेच याठिकाणी जिल्हाधिकारी विपीन इटनकर , महापालिका आयुक्त सुनील लहाने , उपायुक्त अजितपाल सिंग संधू , महापालिका आरोग्यधिकारी श्री. बिसेन आरोग्य कर्मचारी श्री. असद यांनी भेट देऊन माहिती घेतली .
कोरोनाला घाबरुन जाऊ नये - नगरसेवक तिडके
नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे, जेणेकरुन मृत्यूचे प्रमाण रोखता येईल. नागरिकांनी कोरोनाला घाबरु नये, काळजी घ्यावी आणि तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशांत तिडके यांनी केले त्याबरोबर नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment