[ प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत - संपादक ]
भाग - ३.
शाहीर नरेंद्र दोराटे यांचा जन्म उमरखेड तालुक्यातील कुरोळी येथे झाला. चातारी येथे त्यांचेसातवी पर्यंत शिक्षण झाले. कोपरा येथील नागोराव परसराम वानखेडे यांनी सुरवातीला गीत गायण शिकविले . तेव्हापासून कुरोळी परीसरात भजनपार्टी च्या माध्यमातून बुद्ध भीमगीते गाण्याला सुरवात केली. खेडोपाडी कार्यक्रम व्हायचे . दोन गायण पार्टीला बोलावून बुद्ध भीमगीताचा प्रबोधन पर सामणा रंगायचा. समाज प्रबोधन करण्यासाठी आपण पुढे आलो पाहीजे असे मनाला वाटले व स्वत:ला या प्रबोधन चळवळीत झोकून दिले.
बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीने समाज जागृत झाला होता. समाजात चैतन्य निर्माण झाले.शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा विचार पेरण्याचे काम सुरू झाले. दुसरीकडे मागास वर्गीय लोकांवर जातीयवादी लोक अन्याय करत .अशातच दुष्काळ पडला . लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर १जानेवारी १९७७ला नरेंद्र दोराटे किनवट जवळील नागझरी कँप ला कामानिमित्त आले आणि तेथे ते स्थिरावले. किनवट हे शहर त्यावेळी चळवळीचे केंद्र बनले होते. या भागात दलित पँथर १९७७ला स्थापन झाली.सामाजिक कार्यकर्ते दादाराव कयापाक नेतृत्व करत होते. शेख सरदार भाई अध्यक्ष असलेल्या त्या चळवळीत ते सहभागी झाले. पँथर चळवळीने अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढे उभारले होते. त्यानंतर नामांतराचा ही तिव्र झाला होता. अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलनं झाली तर यात नागझरी येथील दिगांबर पंडीत, गोमाजी विणकरे, भीमराव भालेराव, जळबा दोराटे, पांडुरंग नरवाडे सोबत असायचे. त्याच कालावधीत नागझरी कँप येथे त्यांनी भजणी मंडळ स्थापन केले.त्रीरत्न गायण पार्टी असे नाव होतं. या भजन पार्टीचे किनवट व आदिलाबाद परीसरात प्रबोधनाचे कार्यक्रम झाले. तथागत गौतम बुद्ध यांचा समतावादी विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष,माता रमाईचा त्याग समाजाला आपल्या पहाडी आवाजात शाहीरीच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी ते गावोगावी जात. पेटी मास्तर दिगांबर पंडीत तबला मास्तर भिवा ससाणे,गायक बालाजी वाढवे,कैलास विणकरे आणि शाहीर नरेंद्र दोराटे .असा हा त्यांचा संच भीमजयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरीनिर्वाण दिन या निमित्ताने गावोगावी जात असत.भाषणं करणे, गीतं गाणे यामुळे लोकं कार्यक्रम ठेवत तेथे आवर्जुन बोलावत .
अनेक ठिकाणी कार्यक्रम- किनवट, हदगाव उमरखेड, परभणी, लातूर , हिंगोली, यवतमाळ, नागपूर, जळकोट, आदिलाबाद, निर्मल ईत्यादी ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम झाले. बौद्धाचार्य या नात्याने आनेकांचे विवाह लावले. या प्रबोधन कार्यामुळे विष्णु शिंदे, दत्ता शिंदे, लक्ष्मण राजगुरु यांची भेट झाली. परीवर्तन कलामहासंघाचा सचिव म्हणुन वीस जिल्ह्यात फिरता आले.उत्तर प्रदेशात मायावतीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गीतगायण केले.
२०१० मध्ये छत्तिसगढ येथे कार्यक्रम झाला तसेच कर्णाटकला बेंगलोर,नंतर हैद्राबाद येथे शासकीय कार्यक्रम प्रा.डाँ. मार्तंड कुलकर्णी यांच्या सोबतीने जनजागृती करीता सादर केला. लेकी वाचवा लेकी शिकवा, बेटी बचाव बेटी पढाव, पाणी आडवा पाणी जिरवा, तंटामुक्ती,स्त्रीभ्रूण हत्त्या या बाबत गीतं लिहिली . परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते या बाबत नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात फिरुन जनजागृती केली.नांदेड आकाशवाणी वर प्रबोधनपर गीत गायन केले.आज कलावंत म्हणुन महाराष्ट्र शासनातर्फे व केंद्रशासनाचे मानधन मिळत आहे.
मनपसंत गीतं-
१)त्रिसरणाची मंगलवाणी घुमते आमच्या कानी.
२)काय सांगु तुला आता,भीम माझा कसा होता.
३)आज बहुजनानो,दलित जनानो, संघर्ष आपसातील टाळा|
फुले आंबेडकरांच्या ज्ञानाची दौलत सांभाळा||
४)झडुद्या क्रांतीच्या ठिणग्या खुशाल|
पेटवा मशाल$$पेटवा मशाल||
५)केलीस का गं रमा,जाण्याची एवढी घाई|
मी जनतेच्या सेवेमध्ये,तुझे दुःख जाणिले नाही||
प्रकाशित गीत संग्रह-
१)भीमक्रांतीसूर्य -भाग १(२००३)
२)प्रज्ञासूर्य गीतमाला (२००८)
३)भीमक्रांतीसूर्य-भाग२
पुरस्कार-
१) मराठवाडा समाजरत्न, नागपुर
२) महाराष्ट्र रत्न, नागपूर.
३)क्रांतीसूर्य म.फुले समाज रत्न नागपूर.
४) वामनदादा कर्डक संगीत पुरस्कार, आदिलाबाद.
५) समाज सेवा पुरस्कार, हिंगोली.
आदर्श समाज निर्माण होण्यासाठी धम्माचे काटेकोर पालन करावे, तरुणांनी धम्म प्रसाराचे काम करावे असा संदेश प्रबोधन करताना देतात.शाहीर नरेंद्र दोराटे यांचे कार्य निरंतर चालू राहण्यासाठी त्यांना आयुरारोग्य लाभो ही मंगल कामना!
- आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट. मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment