[प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत. संपादक ]
भाग - ४.
शाहीर चंद्रकांत रामराव धोटे यांचा जन्म १५जुन १९६२ साली हिमायतनगर तालुक्यातील खडकी(बाजार) येथे झाला. शिक्षण बी. काँम. पदवी. त्यांच्या घरामध्येच गायणकलेचा वारसा होता. वडील रामराव धोटे हे जुन्या पिढीतील गायक होते. त्यांनी खडकी येथे पहीली भीमजयंती साजरी केली. त्यानंतर दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत. मोठमोठ्या गायक कलावंतांना प्रबोधनासाठी बोलावत. शाहीर नागोराव पाटनकर, दलितानंद, अनुसया शिंदे, पंचशील कलापथक बार्शी टाकळी यांच्या गायनाचा प्रभाव त्यांच्यावर पडला . वडीलाचे प्रोत्साहन मिळाले यातुन आवड निर्माण झाली. उमरखेड तालुक्यातील चातारी येथे माध्यमिक शिक्षण घेतांना आणीबाणी विरोधात स्वरचित गीत गायले . नंतर यशवंत महाविद्यालय नांदेड येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतांना कवीता,कथा लिहिल्या. विविध वर्तमान पत्र, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यातून कथा कविता प्रकाशित झाल्या. 'सूर्यफुल' या कवीतेस पुणे येथील पुरस्कार मिळाला. नंतर साक्षरता अभियानात कलापथक तयार करुन गीतं सादर केली. तत्कालिन जिल्हाधिकारी सुधीरकुमार गोयल साहेब यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला.
वामनदादा कर्डक यांची शाबासकी-
नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे उमाकांत भरणे यांना भेटावयास गेलो असता गायणाच्या कार्यक्रमात वामनदादा यांची भेट झाली. शाहीर धोटे यांचे गीत ऐकुण वामनदादांनी पाठीवर शाबासकीची थाप मारली. त्यानंतर कृष्णा शिंदे, रविचंद्र हडसनकर, निशा भगत, करुणाताई यांचा सहवास लाभला. अनेक कलावंताबरोबर त्यांनी गायण केले. शाहीर बळीराम हनवते, शाहीर क्षीरसागर हटकर, शाहीर आनंद किर्तणे, सुनिता किर्तणे, साहेबराव येरेकार, मंगला कावळे बाबुराव गाडेकर, विशाखा राऊत, आत्माराम साळवे, दयानंद साबळे, कैलास राऊत, माधव वाढवे, नरेंद्र दोराटे, सुमन चोपडे यांच्यासोबत गायण केले. समाजासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर,माता रमाई, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले माता यशोधरा यांच्यासह संत महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन केले. महाराष्ट्रात नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नागपूर, मुंबई, नाशिक, सांगली, पंढरपुर, लातूर, धुळे, अकोला, चंद्रपूर, अहमधनगर तसेच आंध्रप्रदेशात आदिलाबाद, भैसा, निर्मल, ताणुरमंडल, कुबिरमंडल, निजामाबाद असे जवळपास १०००च्या वर त्यांचे कार्यक्रम झाले. महाराष्ट्रराज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार प्रसार करणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले. आकाशवाणी व लाँर्ड बुध्दा टी.व्ही.वर सहभाग घेतला.
मनपसंत गीते-
१)चांदी सांगु ना सोना मांगु
भीमजीके जैसा नगीना सांगु
२)पळू नका शेळीवाणी,सिंहासारखे आव्हान द्या.
भिमसैनिका-भीमाच्या विरा.
मोडा पण कुणापुढे वाकु नका
३)काळा मनी गळी छान गं,पत्नी मी भाग्यवान गं
४)नेता रिपाईयोंके गर इमानदार होते तो
असेंबली मेंआजकल कितने आमदार होते
५)भीमा तुझ्या गीताने रंगून रात गेली
कळले मुळीच नाही,केंव्हा पहाट झाली
६)नको बंदुक मला नको तलवार गं
लेखणीने रमा मी करील वार गं.
अशी एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी लिहिली व ती पहाडी आवाजात शाहीरांनी गायली. त्यांची शेरोशायरी व गीतं अनेक गायकांनी गायली. आज त्यांना समाज राष्ट्रीय प्रबोधनकार म्हणुन संबोधतो व सन्मानाने जयंती सोहळा असो की धम्म परिषद असो तिथे आदराने प्रबोधनासाठी बोलावले जाते.
संदेश-आंबेडकरी चळवळीला गतीमान करण्यासाठी एक व्हा,ऐक्य घडवा एकच नेता निवडा, समाज अंधश्रद्धा व व्यसनमुक्त करा , नियमित विहारात जावुन आदर्श कुटुंब बनवा . असा संदेश आपल्या प्रबोधनपर कार्यक्रमातुन समाजाला देतात.
पुरस्कार-
१) डॉ बाबासाहेब आंबेडकर समता गौरव, भुसावळ
२) वामनदादा कर्डक गौरव, हिमायतनगर
३)बहुजन टायगर युवा फोर्स तर्फे शाहीरी गौरव
४)राज्यस्तरीय मानवसेवा पुरस्कार,लोहा
५) विविध ठिकाणी धम्म परीषदेत सांस्कृतिक कार्यक्रम व गौरव.
प्रबोधन चळवळीतील शाहीर चंद्रकांत रामराव धोटे यांचे योगदान अगदी वाखानन्याजोगे निश्चितच आहे.यापुढील त्यांच्या समाजप्रबोधनाच्या वाटचालीस आनखी गती मिळो ही मनापासून सदिच्छा.!
- आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment