बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ.विलासराज भद्रे यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 21 August 2020

बहुआयामी व्यक्तिमत्त्व डॉ.विलासराज भद्रे यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. महेंद्र नरवाडे
डॉ.विलासराज भद्रे यांचा जन्म २६फेब्रुवारी१९७२ साली तालुका उमरी (रे.स्टे.)येथे झाला.त्यांचे शिक्षण-D.H.M.S.,C.C.H.,P.C.C.,B.A.,M.A.(मराठी),SET,C.C.C.D.एवढे झाले असुन सध्या डॉ. काब्दे  यांच्या दवाखान्याजवळ पिवळी गीरणी , नांदेड येथे त्यांचे अमृत क्लिनिक आहे.
  
  आजी भजनं म्हणायची,मोठे काका नामदेवराव मृदंग वाजवायचे. डॉ.विलासराज भद्रे यांचे वडील अमृतराव नुतन ज्यु.कालेजचे प्राचार्य त्यांना तबलावदनाचा छंद तर आई विमलताई ह्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या तर यांनाही गायणाची आवड होती. तर डॉ.विलासराज भद्रे यांना तबला,ढोलकी,ट्रि ड्रम,ढोलक इ. वाजवता येते. घरात भीमगीत गायण  सतत असल्याने ते पण गाऊ लागले. भीमजयंती निमित्त भजनपार्टी सोबत अनेक गावांत बालगायक म्हणुन जायचे. त्यामुळे कौतुक व्हायचे.घरातच सांस्कृतिक व सामाजिक वातावरण होतं.त्यांच्या बीज संस्कारातुन डॉ.विलासराज भद्रे यांचे व्यक्तीमत्व बहरले. लेखक, निर्माता, दिग्दर्शक, कवी, कथाकार,वक्ता, अभिनेता, निवेदक, पत्रकार, संपादक, आकाशवाणी कलावंत, वैद्यकीय तज्ञ, नाट्य प्रशिक्षक इत्यादी रुपात आज सातत्याने कार्यरत असतात.या अर्थाने ते एक उत्तुंग उंची प्राप्त बहुआयामी व्यक्तिमत्त्व असं संबोधलं तर वावगे ठरणार नाही.

    डॉ.विलासराज भद्रे यांनी आपल्यातील सुप्त कलेला खुप मोकळे पणाने वाव दिला. गावोगावी गीतं सादर करतांना वामनदादा कर्डक यांच्या गाण्याचा परिचय झाला आणि गायणाचे वेड लागले.त्यांच्या सुंदर संकल्पणेतुन "भीमा तुझ्या मुळे","प्रज्ञा सूर्य"व चांदवा या संगीत रजनीची त्यांनी निर्मिती केली.त्या माध्यमातून कलावंतांना घेऊन तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,म.फुले, माता रमाई,भिमाई व सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरक विचारांची पेरणी प्रभावी गीतगायणातुन ग्रामीण व शहरी भागात केली.किनवट तालुक्यात ही गोकुंदा व घोटी येथे त्यांचे ॲार्केष्टाचे कार्यक्रम झाले त्यावेळी मी आवर्जून उपस्थित होतो .तसेच "तपस्याके अग्नीकुंड "भाग१वभाग२, "बुकावर बुकं शिकावं","जिथं भीम नाही असे गाव नाही", बोलतो मी आंबेडकर या व्हीसीडी मध्ये प्रमुख सहभाग घेतला.
त्यांनी २६जानेवारी१९९४ ला"आईक्रिएशन" नांदेड आणि औरंगाबाद या हौसी रंगभुमीची स्थापना केली असुन सलग २०वर्षापासून स्वबळावर वाटचाल सुरु आहे.
प्रकाशित साहित्य..
   आपल्या अभिनय कलेतुन व नाट्य प्रतिभेतून त्यांनी एकांकिका,नाटक,चित्रपट कथा लिहल्या.
आमचाबी पंधरा आगष्ट,अ-अस्मितेचा,आता बुद्ध हसणार नाही,आतड्याचा लिलाव, दवबिंदू पेटतांना,पाषाण पालवी,अंतर निरंतर,खेल खिलौने, अंकुश,और एक शबनम इ. एकांकिका,अंगार अस्मितेचा नाटक याचे लेखन,निर्माता, दिग्दर्शन आणि , यात अभिनेता म्हणुन भुमिका केल्या.तसेच *आता बुद्ध हसणार नाही *अर्थात "पालवी"हा सुपर हिट चित्रपट याची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन व प्रमुख भुमिका त्यांनीच केली.एक बुद्ध विचारांचा तरुण एका क्रुर व विस्तारवादी सत्ताधिशाला नमवुन बुद्ध करुणेची वाटचाल करण्यास भाग पाडतो. ही या चित्रपटाची पटकथा आहे.या चित्रपटाचे नांदेड व किनवटला प्रिमिअर शो झाले.नंतर महाराष्ट्रात व इतर राज्यात त्याच्या डीव्हिडी वितरीत झाल्या आहेत याशिवाय साम्राज्य,धुम्मस या चित्रपटात ही त्यांनी भुमीका केली.

   त्यांचा आंबेडकरी नाटकाचा गृप असुन  यात मराठवाड्यातील १०० कलावंत आहेत.त्यातील अनेक कलाकार चित्रपटात काम करतात.त्यांनी आतापर्यंत १००० नवीन रंगकर्मीना नाट्य प्रशिक्षण दिले आहे.
       संपुर्ण महाराष्ट्र, आंध्रप्रदेश,ओरीसा, मध्यप्रदेश,कर्णाटक,राज्यस्थानमध्ये कला सादर केली.त्यांच्या अंगी असलेल्या काव्य प्रतिभेच्या जोरावर त्यांनी "भीम तलवार"भाग१व "भीम तलवार" भाग२ (गीत व शायरी संग्रह).,"मी कुणाचा" चारोळी संग्रह,अंगारपुष्प,सूर्यसाक्षी,नवा एल्गार काव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत.या माध्यमातून अनेक कवींना त्यांनी प्रेरीत केले आहे.

      डॉ विलास भद्रे हे लोकप्रिय आणि प्रखर निवेदक असून त्यांनी महाराष्ट्र व आंध्रप्रदेशात जवळपास १५००कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे निवेदन केले.
शहरापासून ते राष्ट्रीय स्तरावरील असंख्य साहित्य संमेलनातुन कवी,वक्ता विचारवंत व नाटककार म्हणुन सहभाग घेतला असुन महाराष्ट्राच्या विविध विद्यापिठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात त्यांनी सहभाग घेतला.

मनपसंत गीते-
१)पिल्लु मनुचं जळतय.
२) शक्तीशाली कुंकवाची रमा साथ पाहिजे.
३)एक होऊया रं दादा.
४)भीमगर्जना करुन आता.
५)पेटवुन टाकु आता माजलेले रान सारे.

पुरस्कार-
-महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार.
-आजपर्यंत राज्यस्तरीय १००पारितोषिके,५राष्ट्रीय सन्मान चिन्ह,२५सुवर्ण पदके,१६रौप्य पदके,व ९काश्य पदके.

संदेश-
     तथागत गौतम बुद्ध,विश्वसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या विचारांच्या प्रचार व प्रसारासाठी महाकवी वामनदादा कर्डक यांनी दाखवलेल्या वाटेवरुन सर्व कलावंतांनी प्रवास करावा असा महत्त्वाचा संदेश डॉ.विलासराज भद्रे आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून देतात. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या कलावंतांचे आयुष्य आजुन बहरत राहो ही मंगल भावना व्यक्त करुन शुभेच्छा देतो.धन्यवाद.!

-आयु. महेंद्र नरवाडे किनवट

No comments:

Post a Comment

Pages