महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी लक्ष्मीकांत मुंडे यांच्या नियुक्ती बद्दल पोलीस ठाणे किनवट येथे सत्कार
किनवट : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या किनवट तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल पत्रकार तसेच सिनेभिनेते लक्ष्मीकांत मुंडे यांचा पोलीस ठाणे किनवट येथे सत्कार करण्यात आला.
पत्रकारितेसह सामाजिक बांधिलकी जोपासणारे व पोलीस प्रशासनाला विविध गुन्ह्यांच्या तपासात नेहमीच सहकार्य करणारे म्हणून मुंडे यांची विशेष ओळख आहे. काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून प्रकरणे मिटविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे पोलीस प्रशासनाकडूनही कौतुक करण्यात आले आहे.
पोलीस ठाणे किनवट येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाशी जिव्हाळ्याचे संबंध राखत सदैव जनसेवेसाठी तत्पर राहणारे, सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करणारे आणि जबाबदारीने पत्रकारिता करणारे युवा पत्रकार म्हणून लक्ष्मीकांत मुंडे यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे, पोलीस जमादार सिद्धार्थ वाघमारे,पोलीस अंमलदार रांजणे, मोहोरे, अनंतवार यांनी पुष्पगुच्छ देऊन मुंडे यांचा सत्कार केला.
सत्कारावेळी पोलीस प्रशासनाने मुंडे यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment