किनवटमध्ये १५ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद; ३१ ऑक्टोबरला नियोजन बैठक
किनवट : तथागत बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने येथे दरवर्षी आयोजित केली जाणारी जागतिक बौद्ध धम्म परिषद यावर्षी १५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. किनवट हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान मानले जाते. येथे आतापर्यंत १४ धम्म परिषदांचे यशस्वी आयोजन झाले असून, या परंपरेला यंदाही पुढे नेत १५ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद भव्यदिव्य स्वरूपात घेण्यात येणार आहे.
शुक्रवारी (ता,३१) सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात ही बैठक होणार आहे.या परिषदेसंदर्भात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, सर्व आंबेडकरी बांधव, बौद्ध अनुयायी व समाजप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लक्ष्मण भवरे,मिलींद कांबळे ,एकनाथ मानकर,अभय नगराळे व राहुल कापसे यांनी केले आहे.
नियोजन बैठकीत परिषदेसंबंधीचे कार्यक्रम नियोजन, समित्यांची स्थापना, तसेच आयोजनाची रूपरेषा यावर चर्चा होणार आहे. समाजातील सर्व स्तरातील बांधवांनी एकत्र येऊन धम्मप्रचारासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment