संगीतकार सदाशिव गच्चे यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 20 August 2020

संगीतकार सदाशिव गच्चे यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. महेंद्र नरवाडे




संगीतकार सदाशिव गच्चे यांचा जन्म ७ आक्टोबर १९६४  साली लोहा तालुक्यातील बामणी या गावी झाला.सध्या चंद्रगुप्त नगर नांदेड येथे ते राहतात. त्यांचे शिक्षण बी.ए.(संगीत)बी.एड.पर्यंत झाले असुन नृसिंह विद्यामंदिर, नांदेड येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

    घरातले कुणी या गायण क्षेत्रात नव्हते परंतु आई जात्यावर दळतांना ओव्या व वामनदादा कर्डक यांची गीते गात होती.सदाशिव गच्चे यांच्या कडे उपजतच लहानपणापासुनच ही गायणकला आली. नांदेड ला भीमराव जमदाडे यांची सिद्धार्थ गायण पार्टी होती.त्या गायण संचासोबत गीत गात असत.मोठे झाल्यावर यशवंत महाविद्यालय नांदेड येथे संगीत विषयात बी.ए.केले.महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच एक गीतांचे कॅसेट काढले.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासातील न्यायमूर्ती वराळे साहेब यांच्या हस्ते सहा डिसेंबर ला शिकत असतांनाच ते प्रकाशित केले . बुद्ध भीमाची करुणा गीते गीत -भीमराव जमदाडे, संगीत- पंडीत श्याम गुंजकर,गायक -स्मिता देशमुख,संगीता देशमुख, सुनिल जोंधळे व स्वत: सदाशिव गच्चे यांनी त्यातील गीते गायले. मी ही यशवंत महाविद्यालय नांदेड येथे शिकत असतांना त्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होतो.संगीतातील महत्त्वाचे वाद्य हार्मोनियम चांगल्याप्रकारे वाजवतात विविध प्रकारची गाणी- बुद्ध,भीम गीते, भावगीते, समुह गीते, देशभक्ती पर गीते सुरेल आवाजात ते सादर करतात.त्यांच्या शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम ते संगीत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसह सादर करतात.

सामाजिक कार्य- संगीतकार सदाशिव गच्चे यांनी "दाखल" या सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवीले.

कॅसेट व सीडी-
संगीतकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
१)महासूर्य गीत-अमर रामटेके,गायक-महेंद्र कपूर,उत्तरा केळकर, शकुंतला जाधव,कृष्णा शिंदे.
२)इतिहासाच्या पानावर
   गायक-प्रल्हाद शिंदे,अरुण इंगळे, शकुंतला जाधव, देवीदास हांडे.
३)बाबा तु आमचा दाता-
  गीत-अमर रामटेके,गौतम सुत्रावे,प्रा.रवीचंद्र हडसनकर.
गायक-अरवींद मोहीते,एल.पद्मजा, जितेंद्र अभ्यंकर, सुधाकर.
संगीत-सदाशिव गच्चे.
४)सांज आहे सोबतीला-(भावगीत)-
गीत-अमर रामटेके
संगीत-सदाशिव गच्चे.
गायक-जितेंद्र अभ्यंकर, सुधाकर वाघमोडे.

स्टेज कार्यक्रम-
बुद्ध जयंती,भीम जयंती व इतर कार्यक्रम प्रसंगी "भीमांजली"हा स्वतंत्र कार्यक्रम तयार करुन नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात प्रबोधनपर कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर केले.गोकुंदा ता.किनवट येथेही भीमजयंती निमित्त बुद्ध भीम गीते सादर केली. सदाशिव गच्चे हे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे मान्यता प्राप्त कलावंत असुन"B"ग्रेड पास आहेत.त्यांनी नामवंत गीतकार व गझलकार-सुरेश भट,महेश केळुसकर,प्रकाश ताडले,इलाही जमादार,श्री.दि. इनामदार,अमर रामटेके, यांच्या गीत व गझलांना स्वत: स्वरबद्ध करुन आकाशवाणी नांदेड व आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरुन गीत गायन प्रसारीत केले.
त्यांना  वामनदादा कर्डक यांच्या सह अनेक महाराष्ट्रातील नामवंत गायक कलावंत व संगीतकार यांचा सहवास लाभला असुन एक उत्कृष्ट गायक व संगीतकार म्हणून त्यांनी प्रबोधन चळवळीत मानाचे स्थान निर्माण केले.

संदेश-
  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात आंबेडकरी चळवळीतील जेजे गट निर्माण झाले ते विसर्जित करुन एकसंघ भावनेने संघटित होऊन प्रबुद्ध भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करावी असा संदेश प्रबोधनपर गीतगायणातुन समाजाला देतात.संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रगतीशील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा!धन्यवाद.!

 - आयु. महेंद्र नरवाडे,
 किनवट जिल्हा नांदेड

No comments:

Post a Comment

Pages