[प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत.. संपादक]
भाग - १०.
गायक सिद्धार्थ माधवराव मुनेश्वर- छोटाराजा यांचा जन्म १०जुन१९७९ साली किनवट तालुक्यातील अंबाडी या गावी झाला. त्यांचे शिक्षण एम.ए. एम.एस.डब्लु. बी.एड. किनवटला स्वत: चे किराणा दुकान आहे. छान व्यवसाय करतात.
वडील माधवराव, आई रमाबाई व भाऊ रुपेश मुनेश्वर ही गायक मंडळी घरातच असल्याने गायण कलेचे संस्कार सिद्धार्थ मुनेश्वर यांच्यावर झाले. तेच या क्षेत्रातले सुरवातीचे त्यांचे मार्गदर्शक व गुरु झाले. अंबाडी हे त्यांचे गाव तसं प्रबोधनाच्या बाबतीत अग्रेसर असलेलं गाव संत चिमनाजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी बौद्ध मेळावा होतो. आतापर्यंत अनेक प्रबोधनकार गायक कलावंत येथे आले. त्याचा प्रभाव व प्रबोधन संच घरीच तयार असल्याने गीत सादर करण्यास काही अडचन गेली नाही.
नंतर औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात शिकत असतांना सांस्कृतिक कार्यक्रमात सिद्धार्थ मुनेश्वर भाग घेत असत. कालवश प्रा.अविनाश डोळस सरांच्या प्रोत्साहनामुळे चालना मिळाली. वार्षिक स्नेह संमेलन असो की युवक महोत्सव असो त्यात सहभाग असायचा. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावनभुमीत शिक्षण झाले या औरंगाबाद शहरातुन तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, म.फुले यांच्या विचारांची प्रेरणा त्यांना मिळाली. रमाई ,भिमाई, संत कबीर यांच्या विचारांची शिदोरी घेऊन शिक्षण आटोपून गावांकडे आले. मिलिंद महाविद्यालयातुन बाहेर पडलेला विद्यार्थी स्वस्थ कसा बसेल .
सिद्धार्थ मुनेश्वर यांनी २००५ नंतर प्रत्यक्ष गीत गायणाच्या माध्यमातून प्रबोधन करायला सुरुवात केली. उभरता गायक कलावंत छोटा राजा सिद्धार्थ मुनेश्वर यांनी स्वत:चा संच तयार करुन स्टेज कार्यक्रम सुरू केले. ठिकठिकाणी उत्साही कार्यकर्ते जयंती सोहळे, धम्ममेळावे, धम्मपरिषद आयोजित करत. इतर गायक कलावंतांबरोबर सिद्धार्थ मुनेश्वर यांनाही संधी मिळत गेली त्यामुळे खेडोपाडी शहरोशहरी संचासह जाऊन सातत्याने आजही प्रबोधन करतात. तबला साथ -सचीन कांबळे, सोनु बर्डे, हार्मोनियम- वडील माधवराव मुनेश्वर, बँजो-विलास रावळे, सुधाकर बनसोडे, अमोल कांबळे. कोरस-सुरेश शेंडे, रुपेश मुनेश्वर भाऊ, रमेश हलवले यांचा मिळतो.
त्यांचे वाशीम, नांदेड लातूर, वरोरा,वनी, मानोरा,चैनपुर, अंबाडी,उमरी बाजार, किनवट गोकुंदा अशा अनेक ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम झाले. लोककवी वामनदा कर्डक, मनोजराजा गोसावी यांची जास्तीत जास्त गीतं प्रबोधन करतांना गातात.
मनपसंत गीते-
१)आकाश मोजतो मी,भीमा तुझ्या मुळे.
२)आपल्याच धडावरती आपले डोके असुद्या.
३)चमच्याच्या मागे लागु नको.
४)भीम तुझा बाप झाला,हो का नाही सांग.
५)पत्रात लिहते रमा.
अशी एकापेक्षा एक सरस गाणी ते प्रभावी शेरोशायरी सह सादर करतात.
संदेश-
अंधश्रद्धा समाजाला दु:खाच्या खाईत लोटतात त्या नाहिशा झाल्या पाहिजेत.बौद्ध धम्म हा माणसाला माणुस बनवणारा मानवतावादी धम्म आहे आपले जीवन सुखी बनविण्यासाठी बौद्ध धम्माची शिकवण अंगीकारावी व इतरांना ही प्रवृत्त करावे असा संदेश छोटा राजा सिद्धार्थ मुनेश्वर आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून देतात.
त्यांच्या कार्याला आजुन स्फुर्ती मीळो ही मंगल कामना सह हार्दिक शुभेच्छा!
- आयु.महेंद्र नरवाडे
किनवट, जि.नांदेड.मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment