आंबेडकरी गितकार मधुकर घुसळे यांना भावपुर्ण आदरांजली - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 10 August 2020

आंबेडकरी गितकार मधुकर घुसळे यांना भावपुर्ण आदरांजली



   आंबेडकरी चळवळीचा विचार, प्रचार आपल्या काव्यातून तमाम बहुजना
पर्यन्त नेणारे वामनदादांसोबतचे भीमकवी ,लोककवी "सोनियाची उगवली सकाळ" ने आंबेडकरी चळवळीत आपल्या प्रतिभेने स्थान निर्माण करणारे मधुकर घुसळे (वय ७२),राहणार कल्याण यांचे दिनांक 09/08/2020 रोजी सायंकाळी 9 वाजता हृदय विकाराने  दुःखद निधन झाले.
     कवी, गीतकार मधुकर घुसळे यांनी १९४८ पासूनच कविता गीते लिहिण्यास सुरुवात केली होती.विहार,समाज मंदिर येथे गीतांच्या माध्यमातून त्यांनी
आंबेडकर चळवळ रुजवण्यासाठी मोलाचे योगदान दिले,समाजाचे प्रबोधन केले.लोकगीतांमध्ये सुद्धा त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे.
"डोकं फिरलं या बयेचं डोकं फिरलं या " हे प्रसिद्ध गीत त्यांची रचना.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिन म्हणजे संपूर्ण भारतवर्षासाठीचा मुक्तीदिन या दिवसाचे औचित्य लक्षात घेऊन त्यांनी "पाळणा गीत" सुद्धा लिहिलं आहे.
"सन १८९१ साली तारीख १४ एप्रिल आली
महू गावात चर्चा ही झाली जो बाळा जो जो रे जो
प्रसूत होता भीमाई माता हर्षित झाले रामजी पिता"
त्याकाळी आंबेडकरी जलसे व्हायचे जलासाकार सवाल जवाब करत.
हे सवाल जवाब कधी कधी रात्रीपासून अगदी पहाटे पर्यंत चालत.
त्यावेळी गायक परशुराम पाटील विरुद्ध गायिका शकीला यांचा सामना रंगला होता.शकीला यांनी झाशीच्या राणीचा विषय गायला. "फिरे समशेर चहू कडं खाली एक एक पडं
त्याला मधुकर यांनी पाटील यांना उत्तर लिहून दिले -
"गेले जिंकाय तो गड तानाजी मालुसरे ते पुढं
शेलार मामा विरगळ पडं काढी उदयभानचं मढं"
गतकाळातील आठवणी सांगताना मधुकर सांगतात ऑल इंडिया रेडीओ स्टेशन जळगाव केंद्रावर त्यांचे एक गीत सादर करण्यात आले होते.
त्याचे बोल:
"भीम जय भीम जय भीम जय जय भीम
ऐका मुलींनो ऐका मुलांनो ऐका कळ्यांनो ऐका फुलांनो
नाशिकला त्या पाषणातला मंदिरातून राम ही वदला
महाडच्या चवदार तळ्यातून ध्वनी निघाला जल लहरीतून
भीम जय भीम जय भीम जय जय भीम "
  आपण गाणी ऐकतो तेव्हा सादर करणारे एकतर कलाकार किंवा गायक आपल्यासमोर असतात आणि तीच त्यांची ओळख बनते परंतु ते गीत ती रचना साकारणारे आपल्या लेखणीने प्रत्यक्ष कागदावर उतरवणारे, असे कलाकार कवी गीतकार मात्र खचितच समोर येतात

1 comment:

  1. मधुकर घुसळे सर आणि माझी भेट आमच्या एका कौटुंबिक कार्यक्रमात झाली.मात्र माझे दुर्भाग्य की ती भेट पहिली आणि शेवटची ठरली.मधुकर घुसळे सर हे एक महान व्यक्तीमत्व होते.त्यांच्या बोलण्यात,गाण्यात एक वेगळीच जादू होती.समोरच्या व्यक्तीला जागीच खिळवून ठेवण्याची क्षमता होती.त्याची एक झलक आम्ही त्या कार्यक्रमात अनुभवली होती.मात्र त्यांचा हा अल्पसा सहवास माझ्यासाठी खूपच मोलाचं ठरला. त्यांनी केलेल्या रचना माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील.
    मधुकर घुसळे यांना माझ्या आदरपूर्वक,भावपूर्ण श्रद्धांजली.

    ReplyDelete

Pages