विद्यापीठाने शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाइन घेऊ नये :अक्षय कांबळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 10 August 2020

विद्यापीठाने शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाइन घेऊ नये :अक्षय कांबळे



कोरोना महामारीमुळे चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे पाल्यही  मूलभूत गरजांची पूर्तता करत  चिंतेत आहेत.महाविद्यालयीन शिक्षण घेणारे बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्यामुळे अँड्रॉईड मोबाइल प्रत्येकांकडे उपलब्ध नाहीत ,तर मोबाइल असेल तरी नेटवर्क ची समस्या उद्भ्वत असते अश्यातच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ऑनलाइन क्लास घेण्याचा अट्टहास लावला आहे.
त्यामुळे मा. विद्यापीठ प्रशासनाने अश्या या ऑनलाइन क्लास पासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून हे ऑनलाइन क्लास त्वरीत बंद करून ऑनलाइन क्लास घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी फुले शाहु आंबेडकर युवा मंच चे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages