[प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत.. संपादक]
भाग -९.
प्रसिद्ध गायक सुरेश यादवराव पाटील यांचा जन्म ३०मे१९७४साली माहुर येथे झाला. सध्या गोकुंदा येथील राजर्षी शाहू नगर येथे ते राहतात . त्यांचे शिक्षण संगीत अलंकार, एम. ए. पर्यंत झाले असुन त्यांना संगीतातील तबला, सतार, संयोगीनी, व्हायोलिन,व खंजेरी उत्तम वाजविता येते.
बहुभाषाकोविद यादवराव पाटील,पंडीत वसंतराव शिरभाते, पंडीत अविनाश सोनकर, प्राचार्य सरस्वतीराज जाधव प्रकाशनाथ मुनेश्वर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या घरातील सर्व वातावरणच संगीतमय आहे. आई राधाबाई बुद्ध भीम गीते व पाळणे म्हणायच्या, वडील वामनदादा कर्डक यांची गीते गात असत. बहिनी-शांता, कांता,रमा, भिमा व सिंगर आयडाँल प्रा.प्रतिभा या पण सुरेल आवाजात बुद्ध भीम गीते गातात. भारतीय बौद्ध महासभेचे गेली अनेक वर्षे अध्यक्ष राहुन काम करत करत प्रबोधन करणारे त्यांचे बंधु नाना पाटील हेही सुंदर गातात. पत्नी सुषमा व मुलगी सांची संगीत परीक्षा साधना करतात तर मुलगा अभिनव तबला वाजवतो. एकंदरीत आख्ख कुटुंब संगीतप्रेमी आहे.
गायक सुरेश पाटील यांनाही घरातच गायणकलेचा वारसा मिळाला. लहानपणापासुन वडीलाबरोबर भजनीमंडळात गायण केले. व्यवसायाने सुरेश पाटील हे शिक्षक आहेत . वडीलांनी त्यांना बुद्ध भीम गीताबरोबर गोंडी, बंजारा, कोलामी व उर्दु भाषेतील गीतं शिकविली. नंतर त्यांनी भाषा अवगत केल्या आणि शाळेत अध्यापन करत असतांना त्या बोलीभाषेतुन अध्यापन करतात. कविता गीतं सादर करतात.
किनवट,माहुर परीसरातील बौद्ध धम्म परिषदेत अभिवादन गितासह अनेक कलावंताना सोबत घेऊन भीमवाणी कार्यक्रमातुन प्रबोधन केले. नौकरी करत करत लोकवी वामनदादा कर्डक संगीत अकादमी स्थापन करून वामनदादा कर्डक यांची बुद्ध भीम गीते आपल्या संगीत संचासह गावा गावात जाऊन सादर केली. आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथेही प्रबोधनपर गीतं सादर केली. तसेच प्रा.सागर जाधव यांच्याकडुन वामनदादा कर्डक यांची १०,००० गीतं असलेला संग्रह संग्रहीत केला.
भारतीय बौद्धमहासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या संकल्पनेतून दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी होणा-या व उत्तम कानिंदे यांच्या निवेदनाने सादर केलेल्या अभिवादन पर 'गाणे निळ्या नभाचे'या श्रद्धांजलीपर कार्यक्रमातही कलावंताना घेऊन प्रबोधन केले.अ.भा.आंबेडकरी साहित्य संमेलन पार्डी, अ.भा.द.आ.ग्रा. साहित्य संमेलन उनकेश्वर, अ.भा.बौद्ध उपासक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात व इब्टा शिक्षक संघटना अधिवेशनात गीतगायण केले.
लाँर्ड बुद्धा टी.व्ही.हंट चे परीक्षक म्हणून काम केले.स्टार माझा,साम टि.व्ही.ई. टि.व्ही.,' अंतर्नाद' या विश्वविक्रमी कार्यक्रमात सहभाग घेतला.आकाशवाणी केंद्र,नांदेड येथे बालगीते व यवतमाळ केंद्र येथे लोकगीते सादर केली.
माहुर महोत्सव २००२,ललित पंचमी,स्व.उत्तमराव राठोड संगीत रजनी यामध्ये शास्त्रीय गायण, हुंडाबंदी, वृक्षारोपण, पर्यावरण, स्त्रीभृणहत्या, कोरोना जनजागृती याबाबत बंजारा, तेलगु, गोंडी,कोलामी भाषेतील मराठी भाषेत गीतं गाऊन जनप्रबोधन केले.किनवट येथील धम्मपरिषदेत महाराष्ट्राचा महार या नाटकाला संगीत दिले.
बौद्ध विवाह, सत्यशोधक पद्धतीने व शिवधर्म पद्धतीने अनेक विवाह लावले आहेत.
सहवास-
उस्ताद झाकीर हुसेन, मनोजराजा गोसावी,प्रकाशनाथ पाटनकर, साहेबराव येरेकार, प्रज्ञा इंगळे, आनंद शिंदे, पंडीत प्रभाकर धाकडे,आशा भोसले, पंडीत हृदयनाथ मंगेशकर,पद्मजा जोगळेकर, अनिल खोब्रागडे,पं.पुरूषोत्तम कासलीकर, पं.बोरगावकर, सत्यपाल महाराज,सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, प्रतापसिंग बोधडे.
मनपसंत गीतं-
१)शांती दुताच्या वैभवशाली,जाऊनिया आश्रमा, २)भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते.
३) तुझ्या हाती तुप आलं, तुझ्या हाती साय,
४)निभीड जंगले तुडवीत आलो.
५) तुझ्या पाऊलखुणा भीमराया.
६)रमाई रमाई,माता रमाई.
पुरस्कार-
वामनदादा कर्डक सन्मान आंध्रप्रदेश, वामनदादा कर्डक संगीतराज भुसावळ,आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. आंबेडकर पुरस्कार,जिजाऊ-सावित्री पुरस्कार इत्यादी.
प्राचार्य सुरेश यादवराव पाटील यांच्या प्रबोधन चळवळीतील वाटचालीस व संगीत साधनेस मनापासून हार्दिक शुभेच्छा!
- आयु.महेंद्र नरवाडे, किनवट
जि.नांदेड. मो.न.९४२१७६८६५०
No comments:
Post a Comment