गायक त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे यांचा जन्म १जुलै१९७० साली हिमायतनगर तालुक्यातील वाघी येथे झाला. त्यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले. सध्या ते दिपकनगर तरोडा (बु.) नांदेड येथे राहतात.वडील कालवश एम.पी.भवरे जि.प .शाळेत मुख्याध्यापक होते . त्यांची अनेक ठिकाणी बदली होत असे. वाघी ह्या त्यांच्या मुळ गावी भजनी मंडळात लहान असताना त्रिरत्नकुमार भवरे आपल्या वडिलांच्या सोबत भजनाला जात असत.वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांना गायणाची आवड निर्माण झाली.नंतर वडील सरसम (बु.)येथे रहायला आले. सरसम (बु.) येथे समाज परिवर्तन गायण पार्टीची स्थापना केली.या गायण पार्टीत गावातील गायक कलावंतासोबत त्रिरत्नकुमार भवरे गाणी म्हणत . आजुबाजूच्या परिसरातील अनेक खेडेगावात ही आपल्या संचासह जाऊन गीतगायणाचे कार्यक्रम करुन प्रबोधन करीत आजही ते कार्यक्रम करतात.त्यांच्या संचात हार्मोनियम-शाहीर सुभाष गुंडेकर, सुर्यकांत खिराडे,बँजो- प्रकाश गुंडेकर, तबला-सचिन कांबळे, यशवंत गुंडेकर,भारत कांबळे, ढोल-सिद्धु कवडे, ढोलकी- जगन्नाथ नरवाडे, कोरस-संजय नगराळे,शाहीर रमेश कांबळे,गुणवंत वाघमारे, लक्ष्मण कांबळे, सदाशिव कांबळे हे संगीत साथ देतात .कोणाच्या ही घरी अथवा बाहेर गावी विविध प्रसंगी त्यांची ही गायणपार्टी हजर होऊन प्रबोधन करते.
त्रिरत्नकुमार भवरे भोकर येथील दिगांबरराव बिंदू महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला.त्यात त्यांनी नाटक, एकपात्री प्रयोग यात भाग घेतला व गीतगायणही केले.स्वा.रा.ति.मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात ही गीतगायण केले.त्यांना प्रा. एस.यु.थोरात व प्रा.जे.टी.जाधव सर यांचे मार्गदर्शन मिळत असे.
नंतर परिसरात जयंती चे नामवंत गायक कलावंतांचे कार्यक्रम होत असत त्यामुळे त्यांचा संपर्क वाढला.त्यांच्यतील सुपर्ण कलेमुळे विविध प्रबोधनकारांचा त्यांना सहवास लाभला.त्यांच्या प्रबोधन कलेची त्यांच्यावर छाप पडली. यातून आपल्याच परिसरात ग्रामीण व शहरी भागातील गायक कलावंतांना बोलावून त्यांच्या प्रभावी गीत गायणाचा व प्रबोधनाचा जनतेला लाभ व्हावा म्हणुन अशासकिय असलेल्या बहुजन टायगर युवा फोर्स, स्मृतिशेष गुरुवर्य एम. पी.भवरे, कामारीकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने दरवर्षी हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे त्रिरत्नकुमार भवरे यांच्या पुढाकाराने परिसरातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सांस्कृतिक कलावंतांचा मेळावा 27सप्टेबरला वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेतला जातो .त्यानिमित्ताने कला महोत्सव ही साजरा केला जातो. यात शाहीर जलसाकार, नाट्यकलावंत सिने अभिनेते सहभागी होतात.तसेच बौद्धधम्म परिषद डिसेंबर महिन्यात घेण्यात येते. त्यानिमित्ताने प्रख्यात वक्ते, शाहीर,गायक, सिनेकलावंत व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.कलावंताना संधी देण्यासाठी त्यांनी आयोजक या नात्याने हा मंच उपलब्ध करुन दिला आहे हे विशेष.या ठिकानी प्रख्यात वक्ते, शाहीर, सप्त खंजेरी वादक, अनेक नामवंत गायक,गायिका, यांनी येऊन प्रबोधन केले आहे.या कार्याबरोबरच ते पत्रकार म्हणुनही काम करतात.त्यांची दोन साप्ताहिके आहेत.
मनपसंत गीते-
१)गौतमाच्या चरणी फुलं वाहीलेली.२)माणसा इथे मी तुझे गीत गावे.
३)भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते.
४)ओ बात करो पैदा तुम कंपनी जुबानोंमें.
५)रमाई रमाई,माता रमाई.
पुरस्कार-
संत गाडगेबाबा बाबा नागरी ग्रामस्वच्छता राष्ट्रीय पुरस्कार,जळगाव.
संदेश-
समाजातील युवकांनी धम्म प्रचार व प्रसार करण्यासाठी समोर यावं व जोमाने काम करावं असा संदेश त्रिरत्नकुमार भवरे युवकांना देतात .त्यांच्या पुढील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन कार्यास मनापासून हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद. !
-आयु.महेंद्र नरवाडे, किनवट
जि.नांदेड. मो.न ९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment