प्रति नामन्तर" सारखा लढा लढेल - दिपक केदार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 20 September 2020

प्रति नामन्तर" सारखा लढा लढेल - दिपक केदार

औरंगाबाद प्रतिनिधी:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विध्यापिठाचं विभाजन रद्द करा अन्यथा प्रति नामन्तर सारखा प्रति ल लढा देऊ! शिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिला इशारा!
औरंगाबाद : आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत औरंगाबाद दौऱ्यावर आले असता. औरंगाबाद येते उदय सामंत यांच्यासमोर अचानकपणे घोषणाबाजी करण्यात आली तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात आले. विध्यापीठ आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. विभाजन रद्द झालंच पाहिजे, नामांतर शहिद जिंदाबाद, हुकूमशाही नहीं चलेगी, उदय सामंत मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो.
यावेळी जोरदार घोषणबाजीने परिसर दणाणून गेला होता. उदय सामंत यांनी स्वतः शिष्टमंडळाला बोलवून घेतले. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी आक्रमकपणे सांगितले की, 17 वर्ष आम्ही नामन्तर लढा दिला यात शेकडो बलिदान गेले. मराठवाडा जळत राहिला आता पुन्हा एकदा आपलं आपण सरकार जर विभाजन करत असाल तर आम्ही पुन्हा एकदा प्रति नामन्तर सारखा लढा देऊ, आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे आमची अस्मिता आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. बाळू चोपडे यांनी विभाजनाचा ठराव आणला होता त्यांना सांगितलं होतं की, आगीत हात घालू नका, तेंव्हा आम्ही उद्रेकी आंदोलन केले. त्यांनी राज्यपालांमार्फत ठराव रद्द केला मग विध्यापीठाचा ठराव नसतांना राज्य सरकार विभाजन करण्याचा निर्णय का घेते? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विरोध आहे का?
यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी सांगितलं की, विभाजन आम्ही करणार नाहीत, मी मंत्री म्हणून बसलोय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे... नामन्तरला आमची मान्यता आहे. आम्ही याच बाजूने आहोत. तसा ठराव झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दिपक केदार यांनी लगेच मंत्र्यांना सूचना केली की तात्काळ आजच्याच पत्रकार परिषदेत विभाजन होणार नसल्याची घोषणा करा आणि काढलेला जीआर सुद्धा रद्द करा त्यांनी आज घोषणा करतो असे सांगितले आहे. केदार शेवटचा इशारा दिला की आमच्या भावना विध्यापीठाशी जुडलेल्या आहेत, जर का विभाजन करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा प्रति नामन्तर सारखा उग्र संघर्ष केला जाईल असा इशारा ऑल इंडिया पँथर सेना देत आहे.
नामन्तर शाहिदांचं स्मारक झालं पाहिजे ही मागणी सुद्धा लावून धरली.
या आंदोलनात मराठवाडा प्रमुख सचिन तिवारी, जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे, युवा जिल्हा अध्यक्ष बंटीभाई सदाशिवे, जिल्हा संपर्कप्रमुख करण जगधने, जिल्हा कार्यध्यक्ष शुभम मगरे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनिल त्रिगोटे, जितु रणसुर इत्यादी सहभागी होते अचानक आंदोलन करून निवेदन दिले.

No comments:

Post a Comment

Pages