आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 21 September 2020

आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा

आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलनाचा इशारा


नांदेड- शैक्षणिक वर्ष 2019-20 संपून गेले तरी भारत सरकार द्वारा देण्यात येणारी शिष्यवृत्ती व महाराष्ट्र सरकार द्वारा देण्यात येणारे स्वाधार योजनेचे पैसे अद्याप पर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही.त्यातच सरकारने मंजुरी दिलेल्या 35 कोटी पैकी आपल्या जिल्ह्याला किती मिळाले व ते केव्हा मिळतील हे सुद्धा सांगण्यास आपण टाळाटाळ करत आहात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश वाढत चालला आहे, यामुळे येत्या दहा दिवसात शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर दि. 01-10-2020 रोजी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने समाज कल्याण कार्यालयात "दफ्तर बंद" आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंबेडकरी विद्यार्थी शुध्दोधन कापसीकर, वैभव लष्करे, यशवंत गोणारकर, अतुल मांजरमकर, दिनेश येरेकर यांच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Pages