शेतकरी नेते खंडेराव कानडे यांचे इस्लापूर येथे मुंडन आंदोलन..
किनवट,दि.२५ : देशभरातील २०८ शेतकरी संघटनांनी दिलेल्या आजच्या(दि.२५) अांदोलनाला तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.
भाजपच्या केंद्र सरकारने शेती क्षेत्रा संबंधी काढलेले तीन अध्यादेश आता कायद्यात रूपांतरित होत आहेत. सरकारने काढलेल्या या अध्यादेशात शेती व शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांच्या हवाली करण्याचा डाव आहे. बाजार समित्या उध्वस्त करून, हमी भावाचे संरक्षण काढून घेऊन, शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी हे षडयंत्र आखले गेले आहे.असे विचार यावेळी बोलतांना किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.
भारतातील शेतकऱ्यांवर मोदी सरकारने केलेला हा अत्यंत घातक हल्ला आहे.अखिल भारतीय किसान सभा सामील असलेल्या २०० हून अधिक शेतकरी संघटनांचा मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने व किसान युनियनने या तीन अध्यादेशा विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून किनवट तालुक्यात किनवट, इस्लापूर, शिवणी, तोटंबा, मानंसिंग नाईक तांडा,चंद्रु नाईक तांडा, मार्लागोंडा, तल्हारी, बुरकलवाडी, परोटी, नागापूर, नंदगाव ,कोसमेट, दुर्गानगर इत्यादी गावात जोरदार आंदोलने करुन काळ्या कायद्याच्या प्रतीचे दहन करण्यात आले.
हे अध्यादेश शेतकरीविरोधी असून हे काळे कायदे वापस घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी केली.
या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व काॅ.अर्जुन आडे,काॅ.खंडेराव कानडे,स्टॅलिन आडे,प्रभाकर बोड्डेवार,आनंद लव्हाळे,प्रकाश बोड्डेवार,प्रकाश वानखेडे,काॅ.अजय चव्हाण,प्रकाश ढेरे, अंबर चव्हाण,देविदास राठोड, मांगीलाल राठोड, मनोहर आडे,शिवाजी किरवले,विठ्ठल पंधलवाड ,रंगराव चव्हाण आदिनी केले.
मोदी सरकारचे शेतकऱ्यांना उदध्वस्त करण्याचे षडयंञ शेतकरी हानुन पाडतील.
-काॅ.अर्जुन आडे
( कार्याध्यक्ष किसान सभा,महा)
No comments:
Post a Comment