नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला
मुंबई :- राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नरगपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या. आज राज्यात नगरपरिषदा आणि नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार होते. पण, आता या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहेत.
निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. निकाल पुढे ढकलण्याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबत कोर्टाने आज निकाल दिला आहे.

No comments:
Post a Comment