नागपूर:
कुकडे लेआऊट येथील अभ्यासिकेमध्ये प्रियदर्शनी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थे मार्फत धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त रक्तदान शिबिर पार पडले.या वेळेला समता सेनीक दला द्वारे मानवंदना दिली गेली, तसेच ब्लु कॅनव्हास फाउंडेशन नागपूर यांनी गीते व पथनाट्ये सोबतच साधीर केले. कोरोनाच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालया मध्ये रक्ताचा मोठा तुटवडा असल्याची बातमी आली होती त्या अनुशंगाने युवा मुला मुलींनी कोरोनाच्या काळात मदत मनुनी हे शिबीर घेण्याचे ठरवले.
येथे ६५ जणांनी रक्तदान केले.शिबिराच्या प्रारंभी डॉ. प्रेम, डॉ. किशोर धर्माडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष लीना तामगाडगे, प्रमुख पाहुणे एपीआय सुकेशनी लोखंडे, एनए ठमके उपस्थित होते. संचालन अनिकेत कुत्तरमारे यांनी केले.
या रक्तदान शिबीराचे यशस्वीतेसाठी अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, सिद्धार्थ बनसोडे, शुभम दामले,वैशाली गुटके, शीतल गडलिंग, मृणाल गजभिये, मीनल मेश्राम, सुप्रिया पाटील, काजल गोसावी, मंगेश चाहांडे, निलेश बागडे , नीकेश ढोके आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment