देशातील गंभीर प्रश्नावरून भाजप जनतेला भरकवटत आहे- इम्तियाज जलील.... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 22 October 2020

देशातील गंभीर प्रश्नावरून भाजप जनतेला भरकवटत आहे- इम्तियाज जलील....




वाशी,नवी मुंबई-: देशात आता गंभीर प्रश्न उभे असताना त्यावरुन जनतेचे लक्ष भरकटवण्या साठी भाजप, आर एस एस बजरंग दल एक सुनीयोजित कट रचून देशात हिंदू,मुस्लिम असे धार्मिक प्रश्न निर्माण करून जमतेचे लक्ष विचलित करन्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र  देशातील जनता आता मूर्ख नसून सुज्ञ बनत चालली आहे.त्यामुळे भाजप च्या असल्या भूलथापांना यापुढें बळी पडणार नाही असे वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केले. ए आय एम आय एम प्रणित विद्यार्थी आघाडीचा प्रथम वर्धापन दिनानिमीत्त  नवी मुंबई कामोठे मध्ये विद्यार्थी आघाडीचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.मागील पाच वर्षे राज्यात भाजप चे सरकार होते मात्र तेव्हा यांना मदरसे बंद करावेसे नाही वाटले आणि आता सत्ता नाही तर राज्यातील मदरसे बंद करा असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.त्यामुळे भाजप मूळ मुद्दे सोडुन दुसऱ्याच मुद्द्याना हाथ घालत आहे.आणि असे आहे तर केंद्रात भाजपचे सरकार आहे  त्यामुळे त्यांनी मदरसे बंद करुन दाखवून द्यावे. नाहक नागरीकांचे लक्ष  विचलित करू नये असे देखील जलील यांनी सूनावले. यावेळी  व्यासपीठावर माजी आमदार वारीस पठाण, माजी आमदार फैयाज अहमद,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  डाॅ.कुणाल खरात, उपाध्यक्ष  शहजाद खान, प्रदेश सचिव  प्रशांत वाघमारे, पक्ष प्रवक्ते रविश मोमीन ,प्रदेश महासचिव शहनवाज खान, सहसचिव रुमान राझवी,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष  सानीर सय्यद, मराठवाडा अध्यक्ष  मझर पठाण मराठवाडा कार्य अध्यक्ष अझीम पटेल  आदी मान्यवर सह राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधीकारी उपस्थित होते.


आज देशात असो किंवा राज्यात सर्वच स्तरावर  विद्यार्थी व तरुणांच्या चळवळीतुन एक चांगल्या प्रकारे नेतृत्व पुढे येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांसाठी विद्यार्थी आघाडीने लढणार आहे. आणि येणाऱ्या दिवसात या विद्यार्थ्यांच्या चळवळीला एम आय एम आणखी बळकटी देईल त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यभरातील कॉलेज मध्ये  विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमची विद्यार्थी  आघाडी लढताना दिसेल.

No comments:

Post a Comment

Pages