अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित.. आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 22 October 2020

अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित.. आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत

 नांदेड, (जिमाका)दि. 22 :- अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच 192 पात्र उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हा परिषद नांदेडच्या www.zpnanded.in या वेबसाईटवर आणि जिल्हा परिषदेच्या, नांदेड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयातील आवाराच्या भिंतीवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


प्रतिक्षा यादी 31 जुलै 2020 अखेर प्राप्त प्रस्तावाप्रमाणे घोषित करण्यात आली आहे. घोषित केलेल्या यादीतील ज्या उमेदवारांचे प्रस्ताव अपूर्ण आहेत. अशा अनुकंपा धारकांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही अथवा ज्येष्ठेतबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित अनुकंपा धारकांनी 30 ऑक्टोंबर 2020 पर्यंत त्यांचे म्हणणे लेखी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागास समक्ष अथवा ई-मेल आयडी dyceogadzpnanded@gmail.com सादर करावे. त्यानंतर आलेल्या आक्षेपाच्या विचार करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुधिर ठोंबरे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages