आत्मनिर्भर होण्यासाठी स्वयंरोजगार आणि उद्योग उभारा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे तरुणांना आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 9 December 2020

आत्मनिर्भर होण्यासाठी स्वयंरोजगार आणि उद्योग उभारा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे तरुणांना आवाहन
मुंबई दि. 9 - नोकरी मागणारे होण्या पेक्षा नोकरी  देणारे व्हा. आत्मनिर्भर होण्यासाठी स्वयंरोजगार उभारून उद्योजक व्हा. सर्वांनाच नोकरी मिळेल असे नाही त्यामुळे तरुणांनी उद्योगा कडे स्वयंरोजगाराकडे  वळले पाहिजे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे. भिवंडी येथील गुंदवली मध्ये मास्टर मोल्डिंग या कंपनीचे उदघाटन ना रामदास आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.


 यावेळी मास्टर मोल्डिंग कंपनी चे प्रमुख आंनद नाथानी; जसपाल खोरा;अभिजित गांगुर्डे; जुबेर मुल्ला तसेच रिपाइं चे अनिलभाई गांगुर्डे;शिलाताई गांगुर्डे; सुरेश बारशिंग; श्रीकांत भालेराव; महेंद्र गायकवाड ; अण्णा रोकडे; गायकवाड; घनश्याम चिरणकर आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान अंधेरी आदर्श नगर येथे आरपीआय चे युवा कार्यकर्ते अशपाक मन्सूरी यांच्या डी कोझी या फर्निचर शोरूम चे उदघाटन ना रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उत्तर प्रदेशचे माजी मंत्री जावेद इकबाल मन्सूरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


               

No comments:

Post a Comment

Pages