भैय्यासाहेबांचे कार्य आंबेडकरी चळवळीसाठी दिशादर्शक : श्रावण गायकवाड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 12 December 2020

भैय्यासाहेबांचे कार्य आंबेडकरी चळवळीसाठी दिशादर्शक : श्रावण गायकवाड

औरंगाबाद:

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुर्यपूत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भडकल गेट येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे आजी माजी विद्यार्थी,मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेलफेयर असोसिएशन व आंबेडकरी समूहाच्या  वतीने सामूहिक अभिवादन करण्यात आले


या प्रसंगी बोलताना जेष्ठ नेते श्रावण गायकवाड ह्यांनी आंबेडकरी चळवळीतील भैय्यासाहेबांनी नेतृत्वाच्या स्पर्धेत पासून स्वतःला दूर ठेवत निष्ठेने बाबासाहेबांचे कार्य पुढे नेले रिपब्लिकन ऐक्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले पण नेतृत्वाच्या हव्यासापोटी ऐक्य होऊ शकले नाही,भैयासाहेबांनी आपले कार्य निष्ठेने सुरू ठेवत बाबासाहेबांचे आदर्श पुत्र असल्याचे आपल्या कार्यातून दाखवून दिले.भैय्यासाहेब यांचे कार्य आंबेडकरी कार्यकर्त्यांना दिशादर्शक असे आहे भैयासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा वापर न करता आपल्या साधेपणा तुन आपल्या कार्याची ओळख निर्माण केली.बाबासाहेबांचे अनेक अप्रकाशीत साहित्य भैयासाहेबांनी प्रकाशित केले,बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस च्या माध्यमातून प्रबुद्ध भारत,जनता ही वृत्तपत्रे चालवली,चैत्यभूमी येथील बाबासाहेबांचे स्मारक,रिपब्लिकन ऐक्य,बौद्ध हक्क अधिकारासाठी केलेले आंदोलन,धर्मांतरासाठी देशभर घेतलेल्या परिषदा यातून त्यावेळी धम्म चळवळीला गती मिळाली,आंबेडकरी तरुणांचा त्याकाळचा निस्वार्थी मित्र म्हणून भैय्यासाहेब सदैव कार्यरत राहिले बाबासाहेबांच्या संकल्पनेतील बौद्धमय भारत निर्मितीच्या ध्येयामुळे त्यांनी राजकीय कामापेक्षा धम्म चळवळी चा प्रचार प्रसार केला.


विधानपरिषदेचे आमदार,मुंबई विद्यापीठ अधिसभा सदस्य,भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून केलेले कार्य ऐतिहासिक आहे या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा व धम्म चळवळीला पुन्हा गतिमान करावे व दुभंगलेल्या चळवळीला पुन्हा एकसंघ करण्यासाठी तरुणांनी हा लढा आपल्या हातात घ्यावा असे मत या प्रसंगी सचिन निकम यांनी व्यक्त केले.


यावेळी प्रा.डॉ.सुनील वाकेकर,रुपचंद गाडेकर,उत्तम पंडागळे,डॉ.संदीप जाधव,सय्यद तौफिक,सचिन निकम,प्रा.देवानंद पवार,मुकेश खोतकर,विजय वाहुळ,गुणरत्न सोनवणे,अ‍ॅड.अतुल कांबळे,भाई रत्नाकर खंडागळे,प्रकाश इंगळे,राहुल वडमारे,गणेश साळवे,मनोज शेजवळ,सतीश जाधव,राहुल खंडागळे,पँथर सुनील शिंदे,अशोक मगरे,शैलेंद्र म्हस्के,दिनेश गवळे,सचिन जगधने,दीपक जाधव,मॅडी घुसळे,चिरंजीव मनवर,दिनेश नावगिरे,सोनू भटकर,कपिल बनकर,गुरू कांबळे,महेंद्र तांबे,विशाल इंगोले,सुबोध जोगदंडे,दिलीप तडवी,सोनू पाईकडे,गौतम कहाळे,किरण गायकवाड,अमोल घुगे,नीरज बीडलोन,नागसेन वानखेडे,रवींद्र गवई,गोलू गवई, शैलेश चाबुकस्वार,कुणाल भालेराव,अविनाश जगधने,संदीप वाहुळ,जयश्री शिरके, धम्मप्रिय खरात,अक्षदा शिरके आदींसह रिपब्लिकन विद्यार्थी सेना,रिपाई (खरात),राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष,पँथर विद्यार्थी आघाडी,वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन बहुजन सेना,भीमशक्ती,सम्यक विद्यार्थी आघाडी आदीं संघटनेचे कार्यकर्ते उपस्थीत होते.
No comments:

Post a Comment

Pages