मासुच्या महामुक्कामानंतर अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांला सोमवारी पुन्हा ऑनलाईन परीक्षेला बसण्याची मिळाली संधी; सदर प्रकरणावर सिद्धार्थ विधी महाविद्यालयावर चौकशी समिती नेमली जाईल याचे मिळाले आश्वासन!! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 12 December 2020

मासुच्या महामुक्कामानंतर अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांला सोमवारी पुन्हा ऑनलाईन परीक्षेला बसण्याची मिळाली संधी; सदर प्रकरणावर सिद्धार्थ विधी महाविद्यालयावर चौकशी समिती नेमली जाईल याचे मिळाले आश्वासन!!मुंबई:

सिद्धार्थ विधी महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी नितीन म्हसे याच्यावर झालेल्या अन्यायाबाबत काल  दिनांक ११/१२/२०२० "महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनद्वारे" मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस मध्ये सदर विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी  "सिद्धार्थ विधी  महाविद्यालय" आणि मुबंई विद्यापीठ" यांच्या विरोधात या  "महामुक्काम" आयोजित केला गेला होता. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन "परीक्षा संचालक श्री. विनोद पाटील  यांनी मध्यस्थी करुन सिद्धार्थ विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य "श्रीमती. संध्या ढोके" यांच्याशी टेलिफोनद्वारे चर्चा करुन विद्यार्थी नितेश म्हसेची  पून्हा ऑनलाईन MCQ पद्धतीने सोमवारी  परीक्षा घेतली जाईल  व पुढील  7 दिवसात विद्यार्थ्याचा निकाल जाहीर केला जाईल याची श्वास्वती दिली.


सदर अन्याया संदर्भात  मासूने मुंबई विद्यापीठाकडे  सिद्धार्थ विधी महाविद्यालयावर चौकशी समिती नेमून अन्याय करणारे प्राध्यापक यांना  कठोर शासन करावे  अशी मागणी केली होती, याबाबत विद्यापीठ सकारात्मक पाऊले उचलेल असे आश्वासन सुद्धा महामुक्कामाच्या वेळेस  विद्यापीठाकडून देण्यात आले.No comments:

Post a Comment

Pages