मानवी हक्क दिनानिमित्त गुरुवारी विविध उपक्रमांच्या आयोजनाचे निर्देश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 December 2020

मानवी हक्क दिनानिमित्त गुरुवारी विविध उपक्रमांच्या आयोजनाचे निर्देश


नांदेड , दि. 8 :- जिल्ह्यात गुरुवार 10 डिसेंबर 2020 रोजी मानवी हक्क दिन साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत. 


जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण, कारागृह, बालसुधारगृह अनाथालय आदी विभागांनी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करावी असे राज्य मानवी हक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे सूचित केले आहे. 


या कायदाअंतर्गत समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान व्हावे त्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार न्यायालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग, पंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, महसूल विभागाची सर्व कार्यालये, शिक्षणाधिकारी, कारागृह अधीक्षक, बालगृह मुलांचे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती करावी याविषयी पत्राद्वारे निर्देशीत केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages