रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा विविध मागण्या संदर्भात मोर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 28 December 2020

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा विविध मागण्या संदर्भात मोर्चा

मुंबई :  

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा आजाद मैदान येथे मोर्चा झाला.या मोर्चाचा मुख्य विषय होता मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीला राज्य सरकारने १०० कोटी रुपये मंजूर करावे पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये दहशत माजविणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी तसेच मुंबई विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्टायपेंड मुंबई विद्यापीठाने आपल्या तिजोरीतून द्यावी यासाठी आज भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, सरचिटणीस सुशील महाडिक, कार्याध्यक्ष ॲड.संदीप केदारे, मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे, मुंबई सरचिटणीस प्रशांत मोरे, मुंबई कार्याध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केले हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष रुपेश भालेराव, भायखळा तालुका अध्यक्ष शिरीष चिखलकर, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष धम्मदीप बनसोडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष नागसेन सूर्यवंशी , धर्मराज ब्राह्मणे, उत्तर मुंबई अध्यक्ष सुरेश टिके विजय जाधव, विलास सपकाळ ,साई कांबळे, रोहित गुप्ता, तुषार साळुंके,अभय गोंधळे ,अविक्रांत कदम, चिराग मोलेश्री ,अभिजीत गायकवाड, श्रीकांत जाधव,अकबर शेख आदींनी अथक परिश्रम घेतले.No comments:

Post a Comment

Pages