नांदेड रेल्वे विभागातून महिनाभरातच २५ किसान रेल्वे धावल्या - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 28 January 2021

नांदेड रेल्वे विभागातून महिनाभरातच २५ किसान रेल्वे धावल्या



 नांदेड, २८ जानेवारी,  :

कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्स्प्रेस ५ जानेवारी, २०२१ ला नगरसोल येथून सोडण्यात आली. नांदेड रेल्वे विभागातील नगरसोल येथून आत्ता पर्यंत २५ किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत.ज्यात प्रामुख्याने कांदा पाठविण्यात येत आहे. या किसान रेल्वे संपूर्ण देशभर जसे न्यू गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी , चितपूर, मालदा,अगरतला आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. आत्ता पर्यंत चालविण्यात आलेल्या २५ किसान रेल्वे मधून नांदेड रेल्वे विभागाला ५ कोटी २५ लाख रूपायाचा महसूल मिळाला आहे.नांदेड विभागातून या वर्षी मार्च महिन्याअखेरीस आणखी ७५ किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ठ आहे.

किसान रेल्वे चे वैशिठ्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात, साधारण ५० किलोमीटर प्रती घंटा या वेगाने धावतात, यामुळे शेती माल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजार पेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने "ऑपरेशन ग्रीन्स -टॉप टू टोटल" च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने नांदेड विभागातून धावणाऱ्या सर्व किसान रेल्वे गाड्याला वाहतुकीसाठी ५० टक्के दर सवलत देण्यात आली आहे.विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपेंद्र सिह नांदेड यांनी नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातुन यशस्वीपणे किसान रेल सुरु करण्याकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला. सिंघ यांनी शेतकरी आणि व्यापारी यांना आवाहन केले आहे. किसान विशेष रेल्वे करिता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालया मार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. तसेच नांदेड विभागातून मालवाहतूक वाढवण्यात हातभार लावावा. किसान रेल्वे व्यतरिक्त नांदेड विभागाने या वर्षी माल वाहतुकीमध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन करून बसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी १२ साखरेचे रेक पाठविले. तसेच आदिलाबाद येथून ५ मक्याचे रेक पाठविले. हिंगीली रेल्वे स्थानकावरून ३ वर्षाच्या अंतरा नंतर सरकीचे ३ रेक पाठविण्यात आले तसेच मालटेकडी -नांदेड येथून गुळाचे ५ रेक पाठविण्यात आले आहेत. इंजिनीरिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी रेल्वे पटरी च्या देखरीखी करिता विशेष मेहनत घेतल्यामुळे मालगाड्यांच्या गतीमध्ये खूप सुधारणा झाली आहे, नांदेड विभागातील मालगाड्यांची गती २८ किलोमीटर प्रती घंटा होती यावर्षी ती वाढून ४५ किलोमीटर प्रती घंटा झाली आहे. याचा परिणाम मालवाहतूक वाढण्यावर झाला असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Pages