मुंबई दि.28 - राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला आघाडी च्या महाराष्ट्र अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वाचाळपणा विरुद्ध रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी तर्फे आक्रमक होत रुपाली चाकणकर यांच्या फोटो ला काळे फासून लत्ताप्रहार करीत आझाद मैदान येथे जोरदार निषेध आंदोलन केले.
शेतकरी आंदोलनाला प्रसिद्धी स्टंट असे ना रामदास आठवले म्हणाले नसताना त्यांच्या विरुद्ध अपप्रचार करणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा रिपाइं महिला आघाडी च्या महाराष्ट्र अध्यक्षा ऍड. आशाताई लांडगे; मुंबई अध्यक्षा ऍड.अभयाताई सोनवणे; उषाताई रामळू;नैनाताई वैराट; जयश्री कांबळे ; मुंबई चे युवा आघाडी अध्यक्ष रमेश गायकवाड; सोना कांबळे शिरीष चिखलकर; आदी अनेक मान्यवरांच्या नेतृत्वात रुपाली चाकणकर यांच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान केला नाही तर नेहमी शेतकऱ्यांसाठी ;शेतमजुरांसाठी; भूमीहिंनांसाठी भूमिका घेतली आहे.गरिबांच्या मदतीला धावून जाणारे; दलितांवर अन्याय होईल तिथे न्याय मिळवुन देण्यासाठी पोहोचणारे संघर्षशील नेतृत्व म्हणजे ना.रामदास आठवले असून नुकताच नांदेड मध्ये दलित समाजाच्या अपंग मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली तिथे पोहोचून त्या परिवाराला सांत्वनपर मदत करणारे ना रामदास आठवले संघर्षनायक नेते असून दलित महिलांवर अत्याचार झाल्यावर रुपाली चाकणकर लाली लिपस्टीक लावलेले तोंड घेऊन कुठे लपवून बसलेली असते असा संतप्त सवाल रिपाइं महिला आघाडी ने विचारला आहे.अत्याचार पीडित दलित महिलांच्या मदतीला कधी आल्या का या चाकणकर बाई ? असा सवाल रिपाइं च्या मुंबई अध्यक्षा ऍड.अभयाताई सोनवणे यांनी केला आहे.
दरम्यान पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी रिपाइं महिला आघाडी च्या चंद्रकांता सोनकांबळे; संगीता आठवले; संघमित्रा गायकवाड;शशिकला वाघमारे आदींच्या नेतृत्वात शेकडो महिला कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. गल्लीत कार्यकर्त्यांनी दिल्लीतील नेत्यांवर खोटे आरोप करून टीका करून नये.टीका करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी त्या अधिकारा सोबत जबाबदारी ही असते. ज्यांच्यावर टीका करायची त्यांच्या विधानाची सत्यता तपासून टीका करावी. असे मत रिपाइं च्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा संगीता आठवले यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत रिपाइं ने कधीही टीका केली नाही. मात्र रुपाली चाकणकर सारख्या अपरिपकव आणि प्रसिद्धीलोलुप पदाधिकारी महिलेला राष्ट्रवादी च्या शीर्ष नेतृत्वाने यावर घालावा असे आवाहन चंद्रकांता सोनकांबळे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment