विद्यापीठ कायद्यात सुधारणेची गरज - उपसमितीची सभा - दिवसभरात विविध घटकांशी संवाद - डॉ.सुखदेव थोरात यांच्यासह सहा सदस्य उपस्थित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 28 January 2021

विद्यापीठ कायद्यात सुधारणेची गरज - उपसमितीची सभा - दिवसभरात विविध घटकांशी संवाद - डॉ.सुखदेव थोरात यांच्यासह सहा सदस्य उपस्थित


    औरंगाबाद,  :     महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात मोठया प्रमाणावर फेरबद्दल करण्याची आवश्यकता आहे. अधिकार मंडळावरील नामांकने कमी करुन अधिकाधिक विद्यार्थी केंद्रीत कायदा करावा, अशा सूचना विविध प्रतिनिधो यांनी केल्या.


    महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ, कायदा (अधिनियम) २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी गठित डॉ.सुखदेव थोरात समिती सदस्यांनी शनिवारी (दि.२३) विविध घटकांशी संवाद साधला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सदर बैठक झाली. विद्यापीठ नाटयगृहात या उपसमितीची सभा सकाळी १० ते ६ दरम्यान झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात (माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग) व कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्यासह 

डॉ.विजय खोले (माजी कुलगुरु), डॉ. राजन वेळूकर (माजी कुलगुरु), शितल देवरुखकर-सेठ, डॉ.तुकाराम शिवरे आदी सदस्य उपस्थित होते. तर डॉ. नरेंश चंद्रा (माजी प्रकुलगुरु) हे ऑनलाइन सहभागी झाले. प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिष्ठाता,संवैधानिक अधिकारी उपस्थित होते. शासन निर्णय क्र.साविअ-२०२०/प्र.क्र.३७/विशि ४ दिनांक १९ ऑक्टोबर २०२० अन्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठित केली आहे. सदर समितीच्या ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत विविध उपसमित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा मुल्यांकन समिती या उपसमितीची सभा नाटयगृह येथे झाली. दिवभराच्या या बैठकीत दोन्ही विद्यापीठातील संवैधानिक अधिकारी, अधिकारी, विभागप्रमुख, प्राचार्य, संस्थाचालक, विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, सहसंचालक डॉ.दिगंबर गायकवाड आदी उपस्थित होते. 

    सकाळच्या सत्रात समितीचे समन्वयक डॉ.विजय खोले यांनी दिवसभरातील विविध सत्रांची माहिती दिली. अध्यक्ष पदमश्री डॉ.सुखदेव थोरात यावेळी म्हणाले, विद्यापीठ कायद्यात सुधारणेसाठी सहा उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथे बैठका घेण्यात आल्या. आतापर्यंत शेकडो निवेदन प्राप्त झाली आहेत. देशातील व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचा अभ्यास करुन सुधारणा सुचविण्यात येतील, असेही डॉ.थोरात म्हणाले. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले व प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ यांनी सूचना केल्या. दुपारच्या सत्रात मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य शितल देवरुखकर-सेठ यांनी विद्यार्थी केंद्रित विषय मांडण्याची सूचना केली. दिवसभरात विविध सत्रात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.दिवसभरातील विविध सत्रांचे सूत्रसंचालन संजय शिंदे, डॉ.आनंद वाघ यांनी तर आभार डॉ.पंजाब पडुळ यांनी मानले. 


*कुलगुरूंनी सुचविल्या विविध सुधारणा*


   डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी या उपसमिती समोर विविध सुधारणा मांडल्या. यामध्ये संलग्नित महाविद्यालयात प्राध्यापक भरतीसाठी 'एमपीएससी'च्या धर्तीवर आयोग स्थापन करावा. सर्व विद्यापीठांना संवैधानिक अधिकाऱ्यांची सर्व पदे देऊन ती भरण्याची परवानगी असावी. विद्यापीठ प्रशासन सुरळीतपणे चालविण्यासाठी ही पदे आवश्यक असल्याने त्याचा संबंध भरती बंदीशी जोडण्यात येऊ नये.  विद्यापीठाला पूर्णवेळ अधिष्ठाता असल्यामुळे सहयोगी अधिष्ठाता यांची आवश्यकता नाही. सर्व विद्यापीठांची स्वायत्तता अबाधित ठेवावी मात्र सर्वांचा परीक्षा पॅटर्न सारखाच असावा, असे मतही कुलगुरू डॉ येवले यांनी मांडले.


 *विविध सदस्यांचा सहभाग* 


    दिवभराच्या विविध सत्रात कायद्यात सुधारणेसंबंधी सूचना केल्या. पहिल्या सत्रात सदस्य व कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ यांनी मते मांडली. दुस-या सत्रात उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके, आय.आर.मंझा, डॉ.विष्णु क-हाळे, डॉ. कैलास पाथ्रीकर, भगवान फड यांनी सूचना मांडल्या. तर विभागप्रमुखातून डॉ.स्मिता अवचार, डॉ.उत्तम अंभोरे, डॉ.संजय मून, डॉ.धर्मराज वीर यांनी सूचना मांडल्या. तर प्राध्यापक गटातून डॉ.विक्रम खिल्लारे, डॉ.शंकर अंभोरे, डॉ.अंबादास कदम, डॉ.विलास खंदारे तर प्राचार्यातून डॉ किशोर साळवे, डॉ. फारूकी, डॉ  मोरे यांनी मते मांडली. दुपारच्या सत्रात संस्थाचालक व अधिसभा व व्यवस्थापन परिषद प्रवर्गातून डॉ.राहूल मस्के, संजय निंबाळकर, भाऊसाहेब राजळे, डॉ.राजेश करपे, नरहरी शिवपुरे, डॉ.व्यंकटेश लांब, डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी सूचना केल्या. विद्यार्थी प्रतिनिधी डॉ.उल्हास उढाण, डॉ. तुकाराम सराफ , सचिन निकम, दीक्षा पवार, प्रकाश इंगळे, लोकेश कांबळे, शिरीष कांबळे, गुणरत्न सोनवणे तर शिक्षकेत्तर कर्मचारी गटातून डॉ. कैलास पाथ्रीकर, सतीश दवणे यांनी मनोगत मांडले. सभेसाठी उपकुलसचिव डॉ.प्रताप कलावंत, डॉ.पंजाब पडुळ, भगवान फड,आर.आर.चव्हाण, इंदल जाधव, शहाजी मुदगिरे, अमोल मिसाळ, रणजित तांगडे आदींनी प्रयत्न केले.No comments:

Post a Comment

Pages