भुसावळ ग्रामपंचायत निवडणुकीत वंचितने उघडले खाते - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 4 January 2021

भुसावळ ग्रामपंचायत निवडणुकीत वंचितने उघडले खाते

 


जळगाव, दि.४ - येथील भुसावळ तालुक्यातील दर्यापूर ग्राम पंचायत वॉर्ड क्रमांक ३ मध्ये SC राखीव मधुन लक्ष्मी सिध्दार्थ सपकाळे या बिनविरोध निवडून आल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने ग्रामपंचायत मध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी सलग चार पंचवार्षिक मध्ये विजयी झालेल्या उमेदवार लक्ष्मी सिध्दार्थ सपकाळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, सिध्दार्थ सपकाळे, अरुण नरवाडे जिल्हा कोषाध्यक्ष, संतोष कोळी तालुकाध्यक्ष, बालाजी पठाडे, गणेश इंगळे तालुका सचिव, विजय मालविय शिवाजीराव टेंभुर्णीकर,अरुण तायडे जिल्हा सदस्य आदि पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment

Pages