मानवतावादी ,समतावादी , विज्ञानवादी विचारांचे थोर समाजसुधारक,आद्य स्ञी शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले - प्रा.दगडू भरकड-किनवट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 11 April 2021

मानवतावादी ,समतावादी , विज्ञानवादी विचारांचे थोर समाजसुधारक,आद्य स्ञी शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले - प्रा.दगडू भरकड-किनवट

राष्ट्रपिता ,महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...  

 स्ञी-शुद्रांच्या ( SC, ST, OBC, अल्पसंख्यांक ) मागासले पणाचे कारण अज्ञान आहे हे ओळखून शिक्षणाची दारे खुली करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हे मानवतावादी ,समतावादी , विज्ञानवादी विचारांचे थोर समाजसुधारक,आद्य स्ञी  शिक्षणाचे प्रणेते होते. महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण घेत असताना त्यांच्याकडे कामाला असलेल्या कुलकर्णीनी त्यांचे वडील गोविंदराव फुले यांना सांगितले तुम्ही जर ज्योतिबास शिक्षण दिले तर ते तुमचा पारंपारिक व्यवसाय करणार नाही तुम्ही त्याचे शिक्षण बंद करा आणि ज्योतिबाचे शिक्षण थांबले .गोविंदराव फुलेंचे मिञ लिजिट साहेब व गफ्फार बेग मुन्शी यांनी सांगितल्याने पुन्हा ज्योतिबा शाळेत जाऊ लागले .पाश्चात्त्य विचारवंताची पुस्तके वाचू लागल्याने बहुजनांच्या मागासले पणाचे कारण अज्ञान आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि  त्यांच्या शैक्षणिक कार्यास सुरूवात झाली. याघटनेमुळे शञू -मिञाची ओळखही झाली .मुली-मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक मिळत नव्होते तेव्हा त्यांनी पत्नी सावित्रीस शिक्षण देऊन भारतातील पहिली  प्रशिक्षित स्ञी शिक्षिका बनविले. त्यांच्या याकार्यास सनातन्यानी प्रचंड विरोध केला. शेण,चिखल ,धोंडे मारले तरी त्या थांबल्या नाहीत .शिक्षणाचे हाती घेतलेले कार्य अविरतपणे सुरू ठेवले.

       महात्मा ज्योतिबा फुले यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच समाजातील अनिष्ट चालीरीती ,रूढी,प्रथा ,परंपरा यांनाही विरोध केला , विधवा स्ञीयांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्होता तेव्हा त्यांनी पुनर्विवाह घडवून आणले ,विधवा स्ञीयांचे केशवपन म्हणजे डोक्याचे केस काढणे याप्रथेस विरोध केला ऐवढेच नव्हे तर  न्हाव्यांचा संप घडवून आणला . वाट चुकलेल्या महिलांसाठी बाळंतपणाची व्यवस्था केले. महात्मा फुले हे कृतीशील समाजसुधारक होते .काही लोकं बोलके असतात कृती माञ विरूद्ध असते. 

             त्यांनी आपले प्रेरणास्थान छञपती शिवाजी राजे यांना मानल्याने रायगडावर जाऊन त्यांची समाधी शोधून काढली ,राजांची पहिली जयंती साजरी केली ,त्यांच्या लोककल्याणकारी पराक्रमावर पोवाडा लिहिला , कुळवाडी भुषण ही उपाधी दिली . छञपती शिवाजी महाराजांच्या गुरुचा विषय येतो तेव्हा ते म्हणतात, पाणी मासा खेळे गुरु कोण असे त्याचा म्हणजे मास्याच्या पिल्लास पाण्यात पोहायला शिकवण्याची आवश्यकता नसते. तसेच ज्यांचे वडील शहाजीराजे शुरवीर,पराक्रमी माता जिजाऊ सुसंस्कारी दोन्ही घराण्याचा पराक्रमाचा समृद्ध वारसा लाभलेला असल्याने कोणी दादु कोंडदेव गुरू असण्याचा विषयच येत नाही .अशी इतिहासाची वास्तववादी मांडणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे एक इतिहासकार होते.

      आज आपण काय करत आहोत. महापुरुषांचे नाव घेत आहोत आणि त्यांच्या विचारांच्या आणि कार्याच्या  विरूद्ध कृती करत आहोत. महापुरुषांना जाती,धर्मात बंदिस्त करत आहोत. डोक्यात नव्हे तर डोक्यावर घेऊन नाचत आहोत. त्यांच्या विचार आणि कार्याची जनमानसात पेरणी करण्याच्या ऐवजी त्यांचे नाव घेऊन आपल्या चुकीच्या कृती मुळे महापुरुषांविषयी चुकीची भावना निर्माण करत आहोत .छञपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतीराव फुले, राजर्षी शाहुजी महाराज, विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर , लोकशाही अण्णाभाऊ साठे,आद्य क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा इ. उदाहरणासाठी काही नावे घेतली आहेत. यासर्व महामानवाची विचारधारा एक असल्याने सामाजिक ऐक्य दुभंगेल , समाजात चुकीचा संदेश  जाईल , असे विचार बोलू अथवा लिहू नये. 

       आज त्यांच्या जंयती दिनी त्यांच्या कार्याचा एखादा गुण आत्मसात केल्यास खर्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल...

जय ज्योती,जय क्रांती...


प्रा.दगडू भरकड


No comments:

Post a Comment

Pages