क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 11 April 2021

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

किनवट , ता.११ : स्त्री शिक्षणाचे कैवारी, थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले यांची जयंती आज(ता.११) महात्मा फुले पुतळ्याजवळ कोव्हीड-१९ चे नियम पाळुन उत्साहात साजरी करण्यात आली.

     या वेळी नगर परिषदेचे  अध्यक्ष आनंद मच्छेवार, पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, माजी नगर सेवक प्रकाश नगराळे, सेक्युलर मुहमेंट चे जिल्हा संघटक अॅड मिलींद सर्पे, आमदार भीमराव केराम यांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मऱ्हसकोल्हे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अजय कदम, पत्रकार गोकुळ भवरे, संतोष सीसले, पत्रकार  सम्यक सरपे ,सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल कावळे, उपाध्यक्ष आकाश सर्पे ,अॅड. सम्राट सर्पे, गौतम पाटील, निखील सर्पे, शंकर नगराळे, राजेंद्र भातनासे, शुभम भवरे, मराठा सेवा संघाचे बाळकृष्ण कदम, ब्रम्हा ऐडके, सुनील मच्छेवार, संघर्ष मुनेश्वर, विनोद सी. भरणे, सम्यक सर्पे , लक्ष्मीकांत कापसे, राजेश पाटील  यांनी क्रमाक्रमाने सामाजिक अंतर राखत राष्ट्रपिता महात्मा फुले यांना अभिवादन केले.



No comments:

Post a Comment

Pages