दलित बहुजनांची एकजूट करून रिपब्लिकन पक्षाला व्यापक आकार देणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 12 April 2021

दलित बहुजनांची एकजूट करून रिपब्लिकन पक्षाला व्यापक आकार देणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

भुवनेश्वर दि. 12 -  ओरिसा मधील दलित आदिवासी अल्पसंख्यांक बहुजनांची एकजूट करून रिपब्लिकन पक्षाला  व्यापक आकार देणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.जगतसिंगपूर येथील सरलादास संस्कृत भवन या सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे संमेलन येथे आज पार पडले.त्यात ना रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले.यावेळी रिपाइं चे ओरिसा राज्य अध्यक्ष अब्दुल वली; उपाध्यक्ष सुदर्शन दास आदी मान्यवर उपस्थित होते.

 

ओरिसा ही सम्राट अशोकाने जिंकलेली कलिंगची युद्धभूमी आहे. याच भूमीत सम्राट अशोकाला अहिंसेचे महत्व बौद्ध धम्मामुळे पटले. भगवान बुद्धांच्या बौद्ध धम्माचे धम्मचक्र गतिमान करणाऱ्या सम्राट अशोकाशी धम्माचे नाते सांगत  बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात पुन्हा धम्मचक्र प्रवर्तित केले.त्याच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचा वारसा आम्ही चालवीत आहोत.समता न्याय बंधुता या संविधानिक मूल्यांवर आधारित रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्मियांचा सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष आम्ही साकारत आहोत असे ना.  रामदास आठवले म्हणाले.


 दरम्यान ओरिसाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर ना. रामदास आठवले यांचे भुवनेश्वर येथे आगमन होताच भाजप चे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी ना रामदास आठवले यांची भेट घेतली.रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत एनडीए चा घटक पक्ष आहे. त्यामुळे ओरिसामधील निवडणुकांमध्ये भाजप रिपब्लिकन पक्षाला सोबत घेईल अशी चर्चा उभयनेत्यांमध्ये झाली. 


                

No comments:

Post a Comment

Pages