पँथर्स रिपब्लिकन पार्टी नवी मुंबई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पदी सौ.पूनम अजय गायकवाड यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 24 April 2021

पँथर्स रिपब्लिकन पार्टी नवी मुंबई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पदी सौ.पूनम अजय गायकवाड यांची निवडनवी मुंबई :- 

पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी परिवहन मंत्री, नामांतर प्रणेते, गंगाधरजी गाडे पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा  सूर्यकांता ताई गाडे  व प्रदेश कार्याध्यक्ष मा.प्रा. निवृत्ती आरु  यांच्या आदेशान्वये तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा . आकाश रवि बिऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आयु. अनिल श्रीपत इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या नवी मुंबई महिला आघाडी जिल्हाध्यक्षा या महत्त्वपूर्ण पदीसौ. पूनम अजय गायकवाड यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल नवी मुंबई चे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार आयु. कैलास सोनवणे जी, अथांग वादळ चे संपादक आयु. परमेश्वर म्हस्के जी, आयु. योगेश बोरसे, आयु. मनीष गायकवाड, आयु. अशोक हटकर जी, आयु. अरुण शिसोदिया, आयु. कुणाल ठाकूर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.No comments:

Post a Comment

Pages