कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरी राहून गर्दी न करता साजरी करा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 7 April 2021

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरी राहून गर्दी न करता साजरी करा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 7 - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी संपूर्ण जगात आनंद उत्साहात साजरी होतो.मात्र मागील वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू झाल्याने गेल्या वर्षी ज्या प्रमाणे साधेपणाने भीम जयंती साजरी झाली त्याच प्रमाणे यंदाही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता घरी राहून बुद्ध भीम प्रतिमा पूजन करून साजरी करावी असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.  दि.14 एप्रिलला चैत्यभूमी येथे गर्दी करण्या ऐवजी शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी यावेळी केले.


आज मलबार हिल येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात  येत्या 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 130 वा जयंती उत्सव साजरा करण्याबाबत आयोजित केलेल्या  बैठकीत आढावा घेतल्यानंतर  ना. रामदास आठवले यांनी हे आवाहन केले. 


यावेळी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील; रिपाइं राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; मनपा चे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव;  नागसेन कांबळे सहाय्यक मनपा आयुक्त किरण दिघावकर; सामाजिक न्याय सह सचिव  दिनेश डिंगळे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. गत वर्षा पेक्षा या वर्षी कोरोना चे रुग्ण अधिक प्रमाणात वाढले आहेत. त्यामूळे  यंदा भीम जयंती ला चैत्यभूमी येथे दर्शनासाठी  गर्दी न करता घरी राहून ; शासनाचे नियम पाळून; ऑनलाईन अभिवादन करून  जयंती साजरी करावी असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. 


कोविड- 19 विषाणू च्या प्रादुर्भावाच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबतचे शासनाने स्पष्ट  नियमावली चे पत्रक काढावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना केली.


14 एप्रिल पासून मुंबई मनपा ने कोविड च्या या काळात गरिबांना भोजनदान देण्याबाबत ही विचार करण्याची सूचना ना.रामदास आठवले यांनी केली.


दि. 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी 5 लोकांना परवानगी द्यावी अशीही सूचना ना. रामदास आठवले यांनी केली.

 

*चैत्यभूमी चे स्ट्रक्चरल ऑडिट करा*

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक येथील स्तूप जीर्ण झाला असून मोडकळीस आला आहे. चैत्यभूमी च्या पवित्र ऐतिहासिक स्तुपाची दुरुस्ती तातडीने झाली पाहिजे. जर कधी चैत्यभूमीचा स्तूप कोसळला तर देशभरातील आंबेडकरी जनतेचा उद्रेक होईल आणि त्याचे दुष्परिणाम मुंबई मनपाला ; राज्य शासनाला भोगावे लागतील असा ईशारा ना रामदास आठवले यांनी यावेळी दिला. चैत्यभूमीचे लवकर ट्रक्चरल ऑडिट करावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी मनपा प्रशासनाला केली.


चैत्यभूमी च्या विकासासाठी निधी मनपा कडे उपलब्ध असताना स्तूपाची दुरुस्ती का केली जात नाही असा प्रश्न ना रामदास आठवले यांनी मनपा अधिकाऱ्यांना  विचारला. त्यावर चैत्यभूमी ही खाजगी जागेवर उभी असल्याने मनपा ला तातडीने निर्णय घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यावर प्रकाश आंबेडकर ; भीमराव आंबेडकर; आनंदराज आंबेडकर सर्व आंबेडकर बंधू आणि संबंधितांच्या सहमतीने चैत्यभूमीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली. 

येत्या दि. 14 एप्रिलला बांद्रा पूर्व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages