विभागीय लोकशाही दिनात दोन अर्जांवर सुनावणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 June 2021

विभागीय लोकशाही दिनात दोन अर्जांवर सुनावणी

औरंगाबाद,दि.14 :- लोकशाही दिनात प्राप्त विभागनिहाय प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश उपायुक्त (सा.प्र.वि.) जगदीश मनियार यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या विभागीय लोकशाही दिनात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात दोन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, नायब तहसिलदार रवी जाधव, ए.जी.पटवारी, महिला व बालविकास अधिकारी शरयु देशमुख  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी प्रत्येक विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांत 'विशाखा समिती' स्थापन करण्याबाबत सूचना करताना श्री.मनियार म्हणाले की, कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी विशाखा समितीची ज्या कार्यालयांनी स्थापना केली नाही, त्यांनी तात्काळ समितीची स्थापना करावी. याबाबतची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांना द्यावी. समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात. तसेच प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी. त्याचबरोबर  वृक्षारोपण मोहीम, कोरोनामुळे ज्या बालकांचे आई किंवा वडिल मयत झाले आहे अशा बालकांची माहिती विभाग प्रमुखांनी त्वरीत पाठविण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. 


No comments:

Post a Comment

Pages