आधुनिक साहित्यातला मौल्यवान कोहिनूर हिरा - साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे - प्रा. शशिकांत हाटकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 31 July 2021

आधुनिक साहित्यातला मौल्यवान कोहिनूर हिरा - साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे - प्रा. शशिकांत हाटकर



1 ऑगस्ट 1920  एक शतक उलटून गेले थोर पिता भाऊराव साठे आणि आदरणीय माता वालुबाई यांच्या पोटी वाटेगाव  तालुका वाळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र या दाम्पत्याच्या मुशीतून जन्मास आलेले रत्न म्हणजे  अण्णाभाऊं साठे. यांनी समाजा मधल्या दुर्लक्षित, उपेक्षित, तळागळातील, गावकुसाबाहेरील लोकजीवनाचे अंतरंग शोधले. नव्हे  त्यांच्या  व्यथा आणि कथा आपल्या लेखणीने अधोरेखित केल्या.वाचा फोडली, आणि न्याय दिला. अण्णाभाऊंना पौराणिक आणि रंजनवादी साहित्याचा  मनस्वी तिटकारा होता. कारण प्रस्थापितांचे साहित्य  अवडंबरआणि काल्पनिक होते. वास्तविकतेचा त्यात गंधही नव्हता. जीवनवादी व विज्ञानवादी  वास्तव साहित्याचे अण्णाभाऊ साठे निर्माते  होते. उल्लेखनीय व  कौतुकास्पद विविध रूपाने  त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. विशेषतः अण्णाभाऊंनी कालमार्क्स व लेनीनवादी साहित्याचा पुरस्कार केलेला आहे. तत्वतः ते रशियन क्रांतीचे उपासक आणि चहाते होते. जगप्रसिद्ध 'द मदर' लिहिलेल्या 

 मॅक्झिन गार्गी यांचा पुतळा साहित्याच्या टेबलवर  ठेवून  साहित्य लेखनास सुरुवात करीत असत. अण्णा भाऊं नी समाजा ची गतानुगतीत अत्यंत दयनीय अवस्था व तळागाळातील समाजात जन्माला आल्यामुळे शोषितांचे, दुःख, व्यथा, वेदनां, आणि उपासमारीची जाणीव त्यांना होती. ते भयाण चित्र जवळून पाहताना त्यांच्या. हृदयाला पिळ पडायची आणि व्यथित व  उदिग्र व्हायचे. अण्णा भाऊची  सुरवातच खडतर आणि भेडसावलेल्या जीवनातून बिकट काटेरी वाट आहे. अण्णाभाऊं चे वडील भाऊराव ते लहान वयात असतानाच मुंबईत वास्तव्यास होते. बालवयातच दुःखावर मात केली.  अण्णा दीड दिवसाची शाळा करून. दहा वर्षाचे असताना वडीलाकडे मुंबईला निघून गेले. वाटेगाव ते मुंबई  75 मैलाचा चा प्रवास पायीच केला. आणि मुंबई गाठली व वडिलांची भेट घेतली. भाऊरावांना अण्णाभाऊ ला पाहून  भीतीयुक्त आश्चर्य वाटले आणि त्यांनी अण्णा भाऊंना हृदयाशी कवटाळले.अण्णांच्या डोळ्यात वडिलांना पाहून आनंदाश्रू  भरभरून आले. पण तिकडे आई वालुबाईचा जीव तगमग झाला. कुणीतरी एका समजदार माणसाने आपुलकीने वालुबाई ची समज दूर केली.वार्ता ही कळली की अण्णाभाऊ सुखरूप मुंबईत आले. हळुवार मुंबईची ओळख होऊ लागताच दादर मिलमध्ये बालकामगार म्हणून कामास सुरुवात केली. कामगार लोकात  रममाण झाले. ते ही जीवन जवळून अनुभववास आले. कामगारांचे नेतृत्व करावे अशी मनोमाणशी विचार झाला.आणि 1934 ते 35 च्या दरम्यान लाल बावटा मध्ये प्रवेश केला. घरची आठवण करताना अत्यंत गरिबी व हलाखीचे जीवन होते. खिन्न होऊन विचारात मग्न राहत असत ते प्रामुख्याने बासरीवादक असल्यामुळे अनेक कला गुणांचा छंद त्यांनी जोपासला होता.मराठी शाहिरी,आणि गीते, कवणे,

 पोवाडे, आपोआप ओठी येऊ लागले. आणि समाज जाणीवा सुद्धा डोक्यात थैमान घालू पाहत असतानाच समाजाचे परिवर्तन करावे ही बाब नेहमीच त्यांच्या विचारात होती. बुद्धी तर तेवढी परिपक्व नसताना ही दूरदृष्टी व  वाचनाचे लिहिण्याचे वेड होते त्यांना. भयानक तिमिरात समाज वाटचाल करीत असताना. अंधश्रद्धा,अज्ञान,विकृत, भावभावना चे मोहोल घोंगावत असताना. अण्णाभाऊ या गर्तेतून  समाजास कसे बाहेर काढावे हे स्वप्न पहात असताना .केवळ स्वप्न नव्हे तर वास्तवात समाज  सुज्ञ, विज्ञानवादी, बौद्धिक दृष्टीने   समाज कसा सुदृढ होईल ही चिंता करू लागले. आणि एवढ्यात त्यांना जाणिवा होऊ लागल्या की तर्क वितर्क करू  पाहताना दिन  दुबळ्या,शोषित, पीडित, समाजामध्ये एक महापुरुष, युगप्रवर्तक, समाजात जन्माला आलेला आहे.   अशी खात्री व जाणीव होऊन क्रांती जरूर होणार अशी आरोळी  कानापर्यंत आली. आणि समाजाचा उद्धार हा नक्कीच होणार. हे  दिवा स्वप्न उराशी बाळगून. अण्णाभाऊंच्या इच्छा-आकांक्षा व मनोधैर्य वाढले. आणि तो महापुरुष म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत.

मनशांती व आनंद स्थैर्य  अण्णा भाऊ ना मनोमन लाभले. आणि मानसिक स्वास्थ्य प्रसन्न झाले. ईकडे मुंबई महानगरीत प्रश्नचिन्ह भिन्न विभिन्न   डोळ्यासमोर असताना कधी कधी अण्णाभाऊ भाव विभोर होत असत. खिन्न तेला वाट मोकळी झाली. आणि जीवनात उज्वल पहाट डोकावून पाहत असताना. शांती संयमाची, मानवतेची, प्रज्ञा प्रकाशाने, सर्वांचे दीप प्रज्वलित होतील. अर्थात समतेचे आणि न्यायाचे बीजारोपण होऊन. भारतभर चोहो दिशेने  काही गोड,काही कडू आठवणी चा ठेवा आनंद द्विगुणित  करण्यासाठी अण्णाभाऊ सुद्धा डफावर थाप मारून.श्रमिकात,दलित,

 पददलितांमध्ये आणि बहुजना  पर्यंत डफाची थाप महाराष्ट्रभर निनादू लागली.मग काय क्रांती पर्वाला सुरुवात झाली. वृद्ध, तरुण, बालक, तेवड्याचं प्रेमाने व आस्थेवाईकपणे  आपुलकीच्या स्नेहाने ओथंबून सुख-दुःखात धावून येत. मित्रपरिवार बराच विस्तारला होता. 1931 च्या दरम्यान   मुंबईत चांद बिबीच्या पतर चाळीत रहात भायखळा येथे राहू लागले.1935 माटुंगा येथे दलित युवक संघ संघटनेची स्थापना केली. 1936 ला कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे शी भेट व कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. परंतु अण्णाभाऊंच्या डोक्यात समिश्र विचार मंथन चालू होते.  एकीकडे आंबेडकरवाद व एकीकडे मार्क्सवाद. त्यांच्या डोक्यात दोन्ही महापुरुषांच्या विचारांशी जोडल्या गेल्या मुळे. काही पूर्वग्रह दुशितांच्या  मनात सळ निर्माण होऊ लागली. तेवढ्यातच पत्नीच्या वीरहा मध्ये  एक छक्कड लिहिली. मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण. नसे सुखाला वान,तिच्या गुणांची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होतीया काहीली, असे ते अण्णाभाऊ त्यांची मैना च काय संपूर्ण जगावर ते प्रेम करीत असत. कितीतरी स्तवन गीते लिहिली. क्रांतिकारकाचे त्यानी गुण गायले. 

महापुरुषांना शरण गेले. तीमिरा मध्ये चाचपडणाऱ्या आंधळ्या समाजाला डोळस करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. अंधश्रद्धेवर बोट ठेवून ते म्हणतात. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कामगारांच्या, श्रमिकांच्या,  तळहातावर तरलेली आहे. असे ते ठणकावून सांगत. म्हणूनच तर  अण्णाभाऊ साठे जग बदलण्याची भाषा करतात. जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव.   नऊ महाराष्ट्रा  निर्मूल जगती करी प्रगट निज नाव.सांगून गेले मज भिमराव. का तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञेचा प्रकाश  दिला. नीतिशास्त्राचे धडे दिले.शीलेचा सन्मार्ग दिला अन्यायाला सामोरे गेले. आणि समता प्रस्थापित केली. पारतंत्र्यातून आणि बंद मुक्त केले आणि मनुस्मृती जाळली. आणि साहित्यसम्राट अण्णाभाऊ नी आपली फकीरा नावाची कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. तसेच वैजयंता नावाच्या कादंबरी ला उच्चभ्रू व पांढरपेशी समाजातील लोकांनी प्रस्तावना लिहिण्यास नकार दिला. शेवटी अण्णाभाऊंनीच प्रस्तावना लिहिली. प्रस्तावनेत म्हणतात मी कल्पनेचे पंख लावून कधीच उंच उंच भराऱ्या घेतल्या नाहीत. पाहिले नाही ते आणखीन पुढे जाऊन म्हणतात मी  स्वप्न पाहिले नाही तर ते प्रत्यक्षात कृतिशील लेखणीतून उतरविले. माझ्या लेखणीने समाजाची दिशाभूल केली नाही. व आपली मान उंच करून. बढाई मारली नाही. उंच मनोऱ्यात बसून.  शिकलेली सवरलेली  लोक वांग्मय चोरी करतात. त्यांना प्रश्न पडतो की असे का व्हावे. तरीपण अण्णाभाऊ सारखे साहित्य पारखतात म्हणूनच त्यांना विद्वत जनानी 'साहित्यसम्राट' ही उपाधी दिली. व सन्मानित करून गौरव केलेला आहे. आम्हालाही याच महापुरुषांच्या वाटेने जायचे आहे. हे विसरता कामा नये.  साहित्यसम्राट अण्णाभाऊच्या फकीरा या कादंबरीवर महाराष्ट्रात चित्रपट तयार झाला. यास्तव रशियामध्ये तो फकिरा  रशिया मध्ये गेला. आणि म्हणूनच साहित्य सम्राट अण्णाभाउना रशियाचे बोलावणे आले. ते रशियात जाऊन भारताचे वास्तव चित्र त्यांनी रेखाटले. आणि म्हणूनच त्यांचा   सोव्हिएत रशियाने यथोचित गौरव केला. अण्णाभाऊ मायदेशी परतताना माझा रशियाचा प्रवास  वर्णन केले. व नंतर दुसरी  चित्रा नावाची कादंबरी रशियन भाषेत रूपांतरित केली.

अण्णाभाऊंना नाट्य शास्त्राचा अभ्यास नसताना सुद्धा सुप्रसिद्ध नाटके लिहिली. म्हणूनच त्यांना भारतीय सेक्सपियर मानतात. तसेच वारणेचा वाघ म्हणुन. ख्यातनाम मराठी चित्रपट तयार झाला. भारत देश पारतंत्र्यात असताना 1944 ला  बंगालची हाक नावाचा पोवाडा लिहिला. तो अखंड भारतात गाजल्यानंतर बंगाली विद्वानांनी आणि विचारवंतांनी बंगाली भाषेत अनुवादित केला. पुढे एका भव्य दिव्य समारंभाला  अण्णाभाऊ ला पाचारण केले गेले. तेथे सुद्धा त्यांना गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले. अण्णाभाऊ मुंबईला परतल्यानंतर.  झोपडपट्टीतील भुले, भटके, माकडवाले, यांना पैसा वाटप केला. आणि चिराग नगरच्या 

अंध,अपंग, मूकबधिर,विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप केल्या. एका महापुरुषाने महाडची क्रांती करून मनुस्मृतीला आग लावली. एका साहित्य सम्राटाची हाक रशिया पर्यंत गेली.  आणि क्रांतीबा ज्योतिबा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड सुद्धा जगभर गाजला. राजश्री शाहू महाराजांची किर्ती,सोनेरी इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभर नेला. हे   महापुरुषांचे कार्य ललामभूत करण्यासाठी आपण सर्व बहुजनांनी सजग असले पाहिजे. अशा या महापुरुषांच्या साहित्याची संपदा विषद करताना त्यांनी ३० ते ३५ कादंबऱ्या लिहिल्या. २० ते २५ कथा कथनी लिहिली. तसेच १० ते १५ नाटके लिहिली. ८ ते १० वगनाट्य व तमाशा पट लिहिले. १० ते १५ पोवाडे लिहिले, एक छक्कड लिहिली. अशा महान साहित्याच्या महामेरुला त्यांच्या कार्य कर्तृत्वाला ,व त्यागी जीवनाला व  अमर साहित्यकृतीला आज  त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन करून. त्यांच्या अजरामर कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल...

          -   प्रा. शशिकांत हाटकर, सिडको नांदेड

No comments:

Post a Comment

Pages