प्रा.किशनराव किनवटकर यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 31 July 2021

प्रा.किशनराव किनवटकर यांचे निधन

 


किनवट, दि.31 : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त प्राध्यापक किशनराव किनवटकर उपाख्य किशनराव गोविंदराव तिरमनवार (वय 65 वर्षे) यांचे शनिवारी (दि.31) पहाटे हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.


       त्यांच्या पार्थिवावर किनवट येथील मोक्षधाम स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. येथील ब.पा.महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील प्राध्यापकपदावरून ते सेवानिवृत्त झालेत. माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष, होमगार्डचे जिल्हा समादेशक, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य सल्लागार, लॉयन्स क्लबचे चेअरमन, साईबाबा संस्थानचे विश्वस्थ आदी विविध पदे त्यांनी भूषविलीत. सामाजिक,शैक्षणिक व सांकृतिक क्षेत्रात ते नेहमी अग्रेसर असत.


    त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून, नातवंड असा मोठा परिवार असून, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, बाजार समितीचे सचिव रवी तिरमनवार, व्यावसायिक मनोज तिरमनवार व पत्रकार किरण किनवटकर यांचे ते थोरले बंधू होत.

No comments:

Post a Comment

Pages