नांदेड- मानिनी फाऊंडेशन अध्यक्षा अँटी कोरोना टास्क फोर्स महाराष्ट्र व गोवा राज्य अध्यक्ष गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र अध्यक्ष मा.भारती ताई चव्हाण यांच्या वाढदिसानिमित्त माननी फाउंडेशन व पीपल्स केअर फाउंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने वृत्तपत्र विक्रेते यांना कोरोना काळात यांना सुरक्षित राहता येईल या हेतूने त्यांना ३ पदरी वॉटरप्रूफ माक्स आज जेष्ठ पत्रकार तथा पुण्य नगरी उपसंपादक कृष्णा उमरीकर व पीपल्स केअर फाऊंडेशन चे अध्यक्ष लोकेश सातोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळेस महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार, जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष गणेश वडगावकर, चंद्रकांत घाटोळ, बाबु जल्देवार यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिजवान पटेल, भगवान नवरे, अवधूत सावळे, गणेश जुजाराव, शुभम जल्देवार, बालाजी चंदेल, विनायक आंधे यांनी मेहनत घेतली. तर कार्यक्रमास सरदारसिंह चौहान, दै.सत्यप्रभाचे वितरण व्यवस्थापक गणपत बनसोडे, शंकर हुस्से, सत्यनारायण देवरकोंडा, संजय गोणे, निळकंठ सोनट्टके, भागवत गायकवाड, प्रविण कुलकर्णी, विठ्ठल फडेवार, संजय बेरूळकर, शेख उस्मान, अवधूत पस्लवाड साईनाथ पस्लवाड, प्रशांत कुलकर्णी,खय्यूम पठाण, सत्यनारायण आंधे, अविनाश बोनगुलवार, माधव मामीडवार, रवि रणखांबे, सुरेश चिदगिरे, गणेश रत्नपारखे, नरेश वंगलवार, राजु वंगलवार, विजय बोडखे, अशोक झोळगे ,संगमनाथ भालके, आदी वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.चंद्रकांत घाटोळ यांनी सर्वांचे आभार मानले.
Monday, 26 July 2021

Home
जिल्हा
वृत्तपत्र विक्रेत्यांना पीपल्स केअर फाऊंडेशन नांदेड यांच्याकडून ट्रीपल लेअर वाटर प्रूफ मास्कचे वाटप
वृत्तपत्र विक्रेत्यांना पीपल्स केअर फाऊंडेशन नांदेड यांच्याकडून ट्रीपल लेअर वाटर प्रूफ मास्कचे वाटप
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment