नसोसवायएफच्या मागणीची दखल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 31 December 2021

नसोसवायएफच्या मागणीची दखल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

नांदेड :

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 चे अर्ज सादर करण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2021 ही शेवटची तारीख समाज कल्याण  कार्यालयाकडून देण्यात आली होती. त्यामुळे या संदर्भात नसोसवायएफ या संघटनेने सर्वात अगोदर भूमिका घेऊन स्वाधार योजनेस मुदतवाढ देण्यात  यावी या मागणीचे निवेदन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण  नांदेड कार्यालयास दिले होते.तसेच मुदतवाढ न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. याची दखल घेत नसोसवायएफच्या  मागणीवर डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे.      डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 2020 -21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षांसाठी  समाजकल्याण विभागाकडून अर्ज मागविण्यात आले होते.फॉर्म भरून स्वीकृत करण्यासाठी केवळ  तीन दिवसांची मुदत देऊन प्रक्रिया राबवण्यात येऊ लागली होती.त्यामुळे तीन दिवसामध्ये कागदपत्रे कसे जमा करायचे ? हा सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला होता म्हणून स्वाधार योजनेस मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी 28 डिसेंबर रोजी नॅशनल एसी एस टी ओबीसी स्टुडंन्ट अँड युथ फ्रंट या संघटनेने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना सर्वात अगोदर निवेदन दिले होते आणि या संदर्भात समाजकल्याण विभागाला कळवून सदरील योजनेस मुदतवाढ  मुदतवाढ न  दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यानच्या काळात विद्यार्थी पालक यांची तारांबळ उडाली होती .तसेच पालक फॉर्म स्वीकृतीस असणारा अपुरा वेळ यामुळे एक नाहीतर अनेक समस्यांना विद्यार्थी व पालक यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे या संदर्भात विद्यार्थी हिताय बाजू मांडत नसोसवायएफने  घेतलेल्या भूमीकसे अखेर यश प्राप्त झाले असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात आपल्या ट्विटर द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 31 जानेवारी 2022 पर्यंत  मुदतवाढ  देण्याची घोषणा केली आहे.  तसेच समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी सर्व  आज रोजी परिपत्रक काढून 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ  दिल्याने  विद्यार्थ्यास काहीसा दिलासा मिळाला आहे.

    समाज कल्याण विभागाच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेपासून वंचित राहणार होते .पण नसोसवायएफने केलेल्या मागणीमुळे आता सर्व विद्यार्थ्यांना  याचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना 31 जानेवारी 2022 पर्यंत आपले अर्ज समाजकल्याण आयुक्त कार्यालयात जमा करता येतील.

या संदर्भात नसोसवायएफकडुन तीव्र आंदोलनाचा असा इशारा दिला होता. याची दखल घेतली गेल्याने

 नसोसवायएफच संघटनेचे पालक व विद्यार्थी अशा सर्व स्थरातून कौतुक करण्यात येत आहे.

या मागणीस नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट (नसोसवायएफ) संघटनेचे राज्य प्रवक्ता प्रा.सतिश वागरे,

जिल्हा सचिव अक्षय कांबळे,जिल्हा प्रवक्ता मनोहर सोनकांबळे ,शुभम दिग्रसकर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख,

चंद्रकांत गाडे प्रतिनिधी पी.एन. कॉलेज,

श्रेयश राजभोज प्रतिनिधी यशवंत कॉलेज,नांदेड,यासह अन्य जणांनी या मागणीस जोर धरला होता. 

त्यामुळे या मागणीस यश प्राप्त झाल्याने नसोसवायफचे संघटनेचे पालक व विद्यार्थी अशा सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Pages