पंचरंगी ध्वज निर्मितीचा इतिहास - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 7 January 2022

पंचरंगी ध्वज निर्मितीचा इतिहास

बौध्द धम्माचा कायमस्वरूपी, सर्वमान्य आणि धम्मगुण वैशिष्ट्येयुक्त धम्मध्वज असावा या तळमळीने श्रीलंकेच्या बौध्दानी प्रथमतः बौध्द धम्माच्या ध्वजनिर्मितीसाठी पुढाकार घेतला.परिणामी १९व्या शतकात ' विद्योदय प्रवेन विद्यालय कोलंबो ' या नावाची एक संघटना स्थापणा केली.या संघटनेचे अध्यक्ष होते महास्थविर भदंत सुमंगल,सर्वप्रथम निर्देशक मि.कर्नल आॅलकाॅट,प्रथम सचिव अनागरिक धम्मपाल,सचिव कारोलिस व अनेक विद्वानांचा समावेश या संघटनेत होता.

या संघटनेने सन १८८५ मध्ये वैशाख पोर्णिमे निमित्त,वैशाख फेस्टिव्हल साजरा करायचे ठरविले.बौध्दांच्या सततच्या आंदोलनामुळे ब्रिटिश राजवटीने या दिवशी श्रीलंकेत सुट्टी जाहीर केली.बौध्दांचे मानचिन्ह असलेला तो धम्मध्वज बौध्दांच्या धार्मिक प्रसंगी लावण्याचा निर्णय सुध्दा जाहीर केला.त्यामुळे या कोलंबो संघटनेने बौध्द धम्माचा धम्मध्वज तयार करण्याचा तातडीने निर्णय घेतला.

शेवटी या धम्मध्वजात कोणते रंग असावेत? त्याची स्टेज मांडणी कशी असावी या सर्व बाबीवर सखोल अध्ययन कोलंबो संघटनेचे प्रथम निर्देशक मि.कर्नल आॅलकाॅट व अन्य सदस्यानी केले.

ते असे की - सिध्दार्थ गौतमाला बुध्दगया येथे बोधीवृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्याने त्या प्राप्त ज्ञानाचे ७ ठिकाणी ७ आठवडे सिंहावलोकन केले होते.त्यावेळी त्यानी ४ था आठवडाभर कमल सरोवराजवळील रतनघर येथे चिंतन केले होते.त्यावेळी त्यांच्या उजव्या कुशी कडून अलौकिक असा निळा,पिवळा,लाल,पांढराशुभ्र व केशरी (फिक्कट भगवा) अशा पाच रंगाचा दिव्य प्रकाश निघाला होता.तो त्यांच्या सर्वांगा भोवती पसरला होता.त्यामुळे त्यांचे शरीर खुपच तेजपूंज झाले होते.त्या स्वर्णमय दिव्य तेजाने तेथील बोधीवृक्ष व सभोवतालचा परिसर प्रकाशमान झाला होता.

हे सर्व रंग तथागत भगवान बुध्दाचे द्योतक आहेत.तथागत हे जगातील एक महान व्यक्तिमत्त्व,संपूर्ण जगाचे गुरू.त्यांच्या अंगी ३२ लक्षणे व ८४ व्यंजने होती.त्यापैकी एक औरा रे नावाचे चिन्ह (व्यंजने).बुद्धाच्या संपूर्ण शरीरातून सौंदर्य, चकाकी आणि दिव्य तेज प्रकाशमान करणारे होते.विधीयुक्त पाली भाषेत त्याला सररिपभ्भा, व्यामाप्पाभा किंवा सारीराराम्सी म्हणतात.याच अलौकिक अशा चकाकी तेजास अनुरूप पाच रंग म्हणतात.

तथागत बुद्धाच्या सर्वांगातून निघालेल्या अलौकिक व दैदीप्यमान अशा पाच रंगाची महानता,विशेषता व त्यांची वैशिष्ट्ये व त्यापासून मिळणारा शुभसंदेश असा आहे.

१) निळा_रंग : हा रंग औदार्य,उदारता,विशालता,परोपकार व मनाचा मोठेपणा दर्शवितो.हा रंग तथागताच्या निळ्या डोळ्यांचा व निळसर केसांचा रंग म्हणून घेतला आहे.

२) पिवळा_रंग : हा रंग पावित्र्य,मांगल्य,प्रसन्नता व हर्षोल्हास व शुभ्रतेचे प्रतिक आहे.हा तथागतांची अंगकांती आणि डोळ्यातील पिवळा भाग म्हणून घेतला आहे.

३) लाल_रंग : हा रंग हिंसेची घृणा करण्याचा आणि हिंसेपासून अलिप्त राहाण्याचा संदेश देतो.हा रंग तथागताच्या शरीराचा मांसल भाग,रक्त आणि डोळ्यातील लाल रंगाचा भाग इ.चे प्रतिक आहे.

४) पांढरा_रंग : हा संपूर्ण विश्वात शांती,समता व बंधुता नांदावी अशी शिकवण देतो.तसेच हा रंग शुध्दता,पवित्रता व उच्च कोटीच्या शीलवंत चारित्र्याचे प्रतिक आहे.हा रंग तथागताच्या हाडाचा,दाताचा व डोळ्यातील पांढऱ्या भागाचे प्रतिक म्हणून घेतला आहे.

५) केशरी_रंग (मांजेस्ता,शेंदरी किंवा फिक्कट भगवा )

हा रंग भ्रांति मिटवून सदैव स्मृती जागृत ठेवतो.तसेच सर्व तृष्णा,अभिलाषा व अकुशल कर्म ई.पासून सावध करणारा व त्यावर विजय प्राप्त करण्याचा संदेश देणारा रंग आहे.हा रंग तथागताच्या शरीरातील विविध भागातील रंगाचे प्रतिक म्हणून घेतला आहे.

६) पभास्सारा : हा रंग म्हणजे वरील पाचही रंग मिळून एकत्रित झालेला सहावा रंग होय.हा रंग सर्वसमावेशक शालीनता,नम्रता व लिनता शिकवतो.

हा रंग तथागताच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांच्या वरील पाच रंगाचे सर्वसमावेशक प्रतिक म्हणून घेतला आहे. 

अशाप्रकारे वरील ६ रंगाची महानता,मौलिकता,आणि वैशिष्ट्ये व त्यापासून मिळणारे शुभसंदेश या सर्व बाबींचे सखोल अध्ययन करून ' विद्योदय प्रिवेन विद्यालय कोलंबो ' या संघटनेने सर्वप्रथम या सहा रंगाचा धम्मध्वज तयार करून ' तथागत भगवान बुध्दाच्या शरीरातील वेगवेगळ्या भागाच्या रंगाचा समावेश बौध्द धम्माच्या ध्वजात करून दि ८ जानेवारी १८८५ रोजी धम्मध्वज तयार करण्यात आला ' असे वृत्त कोलंबोतील ' सारासावी संदारासा ' या वृतपत्रात प्रकाशित करण्यात आले.त्यानंतर दि.१७ एप्रिल १८८५ रोजी कोलंबो कमेटीने या ध्वजाला ' बुध्दिस्ट धर्मध्वज ' म्हणून मान्यता दिली.


संदर्भ : ' तथागत व बौध्द स्थळांचा इतिहास '

संकलन : बी.एन.साळवे

No comments:

Post a Comment

Pages